मुख्यपृष्ठ / पाककृती / पीनट चोकलेट

Photo of Peanut chocolate by seema Nadkarni at BetterButter
254
3
0.0(0)
0

पीनट चोकलेट

Sep-01-2018
seema Nadkarni
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पीनट चोकलेट कृती बद्दल

हि पाक कृती मुलांना आवडणारी आहे. आणि झटपट होते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • मायक्रोवेवींग
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप कूकिंग चोकलेट
  2. 1/4 कप शेंगदाणे
  3. चोकलेट चे मोल्ड
  4. 1-2 चमचा मध

सूचना

  1. कूकिंग चोकलेट चे बारीक तुकडे करून घ्यावेत.
  2. शेंगदाणे कढईत भाजून घ्या, थंड झाल्यावर त्याची जाडसर भरड मिक्सर मधून करून घ्यावे.
  3. त्या भरड मध्ये मध घालून एकत्र करून बाजूला ठेवावे.
  4. आता गॅस वर एका पातेल्यात पाणी घालून गरम होवू द्या..
  5. बारीक तुकडे केलेल्या चोकलेट ला काचेच्या बाऊल मध्ये ठेवून, गरम पाण्याच्या पातेल्या वर ठेवून मेल्ट करून घ्या. ( ह्याला डबल बोइलर मेथड म्हणतात)
  6. आता ह्या चोकलेट ला मोल्ड मध्ये चमच्याने घालावे. मोल्ड भरल्या वर त्याला थोडा आपटून घ्या, म्हणजे सगळ्या बाजूला चोकलेट चिटकून जाईल.
  7. आता या मोल्ड ला चोकलेट च्या बाउल मध्ये उलट करुन घ्या, मधली चोकलेट निघून जाईल..
  8. या मोल्ड ला 2-3 मिनिटे फ्रिज मध्ये ठेवावे..
  9. तो पर्यंत बाकीच्या चोकलेट चा बाउल गरम पाण्याच्या पातेल्या वर ठेवावी म्हणजे चोकलेट परत मेल्ट होत राहील.
  10. 2-3 मिनिटांनी मोल्ड बाहेर काढून त्याच्या मधल्या भागात शेंगदाण्याचे मिश्रण चमच्याने घालावे.. पुणॅ भरू नये.
  11. आता मेल्ट झालेली बाकी ची चोकलेट परत एकदा चमच्याने मोल्ड मध्ये घालावी.
  12. सगळे मोल्ड भरल्या वर त्याला परत एकदा आपटून घ्यावे.. व फ्रिज मध्ये सेट करायला 5-10 मिनिटे ठेवावी.
  13. सेट झाल्यावर मोल्ड एका स्वच्छ कपड्या वर ठेवून अनमोल्ड करून घ्यावे.. म्हणजे उलट करुन हलक्या हाताने आपटून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर