कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा चिक्की आणि साबुदाणा खिचडी

Photo of Sago and groundnut khichdi by Anil Pharande at BetterButter
0
0
0(0)
0

शेंगदाणा चिक्की आणि साबुदाणा खिचडी

Sep-01-2018
Anil Pharande
120 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा चिक्की आणि साबुदाणा खिचडी कृती बद्दल

व्रत व उपसासाठी झटपट होणारी स्वादिष्ट खिचडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • स्टर फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. साबुदाणा 1 कप
  2. शेंगदाणा कूट 1/2 कप
  3. शेंगदाणा तेल 4 टेबलस्पून
  4. जिरे 1 टीस्पून
  5. आले 1/2 इंच किसलेले
  6. हिरव्या मिरच्या 2 बारीक चिरून
  7. कढीलिंब 4 ते 5 पाने
  8. उकडलेला बटाटा 1 मध्यम आकाराचा
  9. लिंबूरस 1/2 लिंबाचा रस
  10. पिठीसाखर 2 टेबलस्पून
  11. काळे मीठ 1/4 टीस्पून
  12. काळी मिरी पावडर 1/2 टीस्पून
  13. कोथिंबीर चिरलेली मूठभर
  14. शेंगदाणा चिक्की
  15. डाळिंबाचे दाणे पाव कप
  16. भाजलेले शेंगदाणे 1/4 कप
  17. सोबत थंड दही सर्व्ह करण्याकरिता

सूचना

  1. साबुदाणा दोन तास पाण्यात भिजत ठेवा
  2. दोन तासानंतर त्यात 1 टेबलस्पून शेंगदाणा तेल गरम करून घाला व मिक्स करा
  3. एका भांड्यामध्ये पाणी उकळण्याकरिता ठेवा व त्यावर एक स्टँड ठेवा, त्या स्टँडवर साबुदाण्याचे भांडे ठेवा व भांडे झाकून 6 ते 7 मिनिटे वाफवून घ्या
  4. पॅनमध्ये 3 टेबलस्पून शेंगदाणा तेल गरम करण्यासाठी ठेवा
  5. त्यात जीरे, 1/2 इंच किसलेले आले, 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या व 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालून फोडणी करून घ्या
  6. त्यात शिजवलेल्या बटाट्याच्या फोडी घाला व मिक्स करा
  7. अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घाला मिक्स करा व साबुदाणा घाला व मिक्स करा
  8. अर्ध्या लिंबाचा रस घाला मिक्स करा
  9. 2 टेबलस्पून पिठीसाखर घाला मिक्स करा
  10. अर्धा चमचा काळी मिरी पावडर घाला मिक्स करा
  11. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व मिक्स करा
  12. शेंगदाणा चिक्की चुरडून घाला व मिक्स करा
  13. प्लेटमध्ये सर्व्ह करा व डाळिंबाच्या बियांनी व भाजलेले शेंगदाणे यांनी गार्निश करा
  14. थंड दह्याबरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर