मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा चिक्की आणि साबुदाणा खिचडी

Photo of Groundnut and sago stir fry by Anil Pharande at BetterButter
933
0
0.0(0)
0

शेंगदाणा चिक्की आणि साबुदाणा खिचडी

Sep-01-2018
Anil Pharande
120 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा चिक्की आणि साबुदाणा खिचडी कृती बद्दल

उपास व व्रतसाठी झटपट होणारी स्वादिष्ट खिचडी

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • इंडियन
  • स्टर फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. साबुदाणा 1 कप
  2. शेंगदाणा कूट 1/2 कप
  3. शेंगदाणा तेल 4 टेबलस्पून
  4. जीरे 1 टीस्पून
  5. आले अर्धा इंच किसलेले
  6. हिरव्या मिरच्या बारीक चिरून 2
  7. कढीलिंब 4 ते 5 पाने
  8. उकडलेला बटाटा 1 मध्यम आकाराचा फोडी करून
  9. अर्ध्या लिंबाचा रस
  10. पिठीसाखर 2 टेबलस्पून
  11. काळे मीठ 1/4 टीस्पून
  12. काळी मिरी पावडर 1/2 टीस्पून
  13. चिरलेली कोथिंबीर 1/2 कप
  14. शेंगदाणा चिक्की क्रश करून 1/4 कप
  15. डाळिंबाचे दाणे 1/4 कप

सूचना

  1. साबुदाणा 2 तास पाण्यात भिजत ठेवा
  2. 2 तासानंतर त्यात 1 टेबलस्पून शेंगदाणा तेल गरम करून घाला व मिक्स करा
  3. एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा व त्यात एक स्टँड ठेवा, उकळी आल्यानंतर त्यात सबुडण्याचे भांडे ठेवा व झाकून 6 ते 7 मिनिटे वाफवून घ्या
  4. पॅनमध्ये 3 टेबलस्पून शेंगदाणा तेल गरम करण्यासाठी ठेवा
  5. त्यात जीरे, किसलेले आले, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्त्याची पाने घालून फोडणी करून घ्या
  6. त्यात शिजवून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घाला, परतून घ्या
  7. शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करा, साबुदाणा मोकळा करून घाला व मिक्स करा
  8. लिंबाचा रस घाला व मिक्स करा
  9. पिठीसाखर घाला व मिक्स करा
  10. काळी मिरी पावडर व काळे मीठ घाला व मिक्स करा
  11. चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा
  12. शेंगदाणे चिक्की चुरडून घाला व मिक्स करा
  13. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढा ,त्यावर डाळिंबाच्या बिया व भाजलेले शेंगदाणे यांनी गार्निश करा
  14. थंड दह्याबरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर