मुख्यपृष्ठ / पाककृती / काजू आणि वांगी फ्राय

Photo of Brinjal & Cashewnut Fry by Anil Pharande at BetterButter
408
0
0.0(0)
0

काजू आणि वांगी फ्राय

Sep-01-2018
Anil Pharande
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजू आणि वांगी फ्राय कृती बद्दल

झटपट होणारी चटपटीत, स्वादिष्ट, साइड डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • स्टर फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. लहान कृष्णाकाठची 6 वांगी उभ्या फोडी करून
  2. तेल 2 टेबलस्पून
  3. मोहरी 1 टीस्पून
  4. कढीलिंब 8 ते 10 पाने
  5. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून
  6. लसूण पाकळ्या 4 बारीक चिरून
  7. चना डाळ 1 टेबलस्पून
  8. उडीद डाळ 1 टेबलस्पून
  9. आख्खे धने 1 टेबलस्पून
  10. काळी मिरी 1 टेबलस्पून
  11. सुक्या लाल मिरच्या 2
  12. हळद 1 टीस्पून
  13. लाल मिरची पावडर 1/2 टीस्पून
  14. काजू 1/4 कप
  15. कोथिंबीर 1/4 कप चिरून

सूचना

  1. कढईमध्ये तेल गरम करून घ्या व त्यात मोहरी, कढीलिंबाची पाने घाला व अर्धा मिनिट परतून घ्या
  2. चिरलेला कांदा व चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून कांदा पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्या
  3. त्यात वांग्याच्या फोडी घाला व मिक्स करा
  4. उडीद डाळ,हरभरा डाळ,काळी मिरी, धने व लाल सुक्या मिरच्या तव्यावर कोरड्या भाजून घेऊन थंड झाल्यानंतर मिक्सरमधून जाडसर पूड करून घ्या व ही पावडर वांग्यामध्ये घाला
  5. हळद पावडर घाला, लाल तिखट घाला, काजू घाला मिक्स करा, थोडा पाण्याचा हबका द्या मीठ घालून झाकण ठेवून वांग्याच्या फोडी शिजवून घ्या. मध्ये एक दोनवेळा झाकण उघडून परतून मिक्स करा
  6. कोथिंबीर ने गार्निश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर