मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडीचे मोदक

Photo of Ukadiche Modak by Chhaya Paradhi at BetterButter
2860
0
0.0(0)
0

उकडीचे मोदक

Sep-01-2018
Chhaya Paradhi
20 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडीचे मोदक कृती बद्दल

उकडीचे मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. बासमती तांदुळाचे पिठ २कप
  2. पाणी २कप
  3. तुप किंवा लोणी २च
  4. मिठ
  5. ओल खोवलेले खोबर २कप
  6. गुळ १ १/२ कप (गुळ कमी करता येतो)
  7. वेलची जायफळ पावडर १च
  8. ड्रायफ्रुट आवडीनुसार ४-५च

सूचना

  1. मोठ्या कढईत किंवा पातेल्यात पाणी गरम करा
  2. पाणी उकळल्यावर मिठ टाका
  3. तुप किंवा लोणी टाका
  4. तांदुळाचे पिठ टाका
  5. पिठ परतुन २-३मिनटे झाकण ठेवा
  6. परत पिठ हलवुन घ्या
  7. पिठावर झाकण ठेवुन वाफ काढा
  8. उकड तयार झाल्यावर ताटात काढा
  9. गरमगरमच उकड पाणी व तुप लावुन मळुन घ्या
  10. किंवा उकड फुडप्रोसेसर मधुन फिरवुन घ्या
  11. उकड रुमालाने झाकुन ठेवा
  12. कढईत तुप गरम करा
  13. त्यात खोबर परता
  14. किसलेला गुळ घालुन परता व शिजवा
  15. वेलची जायफळ पावडर टाका
  16. ड्रायफ्रुट टाका
  17. उकडीचा लहान गोळा घ्या
  18. मोदकाच्या साच्याला तुप लावुन घ्या
  19. पिठाचा गोळा साच्यात घालुन बोटांनी नीट साच्यात पसरवुन घ्या
  20. खोबर्याचे सारण भरा
  21. व मोदक पिठाने तोंड बंद करा
  22. हलक्या हाताने साचा उघडुन मोदक काढा
  23. तयार मोदक मोदक पात्रात ठेवा
  24. १५-२०मिनटे मोदक वाफवुन घ्या
  25. मोदक ताटात काढुन वरून तुपाची धार घालुन सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर