मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याच्या शेंगा

Photo of Drumstick by Suchita Wadekar at BetterButter
0
1
0(0)
0

शेवग्याच्या शेंगा

Sep-01-2018
Suchita Wadekar
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याच्या शेंगा कृती बद्दल

★ शेवग्याच्या शेंगांचे फायदे - :arrow_heading_down: शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि मुबलक व्हिटामिन्स आढळतात. यामुळे हाडांना मजबुती मिळते. त्यामुळे त्याचा रस किंवा दूधासोबत शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश करणे हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर ठरते. म्हणूनच मुलांच्या हाडांची वाढ सुधारण्यासाठी त्यांच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करावा. शेवग्याच्या पानांप्रमाणेच त्यांच्या शेंगामध्येदेखील रक्ताचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असते. त्यामुळे हे शरीरात अ‍ॅन्टीबायोटीक एजंट म्हणून काम करते. त्यामुळे रक्तातील दुषित घटक वाढल्याने होणारा अ‍ॅक्नेचा त्रास, त्वचाविकार कमी करण्यास शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात. शेवग्याच्या शेंग्यांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. परिणामी मधूमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पित्ताशयाचे कार्य सुधारण्यासही शेंग़ा फायदेशीर ठरतात. त्यामुळे शरीराचे कार्य आणि स्वास्थ्यही सुधारते. प्रसुतीसोबतच गर्भारपणाच्या काळातील आणि प्रसुतीनंतरच्या दिवसातील त्रास कमी करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात. शेवग्याच्या शेंगांमधील व्हिटामिन्स आणि मिनरल्स घटक गर्भाशयाचे कार्य आणि आरोग्य सुरळीत ठेवण्यास मदत करते. तसेच प्रसुतीनंतर नवमातंचे दूध वाढवण्यास मदत करतात. शेवग्याच्या पानांमध्ये, शेंगांमध्ये बी कॉम्पलॅक्स घटकांचा मुबलक साठा असतो. त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. शेवग्याच्या शेंगांमधील व्हिटामिन्स पचनकार्य सुधारते. शेवग्याच्या पानाइतकेच शेवग्याच्या शेंगानासुद्धा महत्त्व आहे. शेवग्याच्या शेंगेत व त्याच्या बियांमध्ये व्हिटॅमीन ए, बी, बी २, बी ३, आणि सी, फोलिक ऍसिड, बीटाकॅरेटीन इत्यादी शरीर स्वास्थ्याचे घटक असल्यामुळे ‘बहुमूल्य’ आहेत. याची खासीयत अशी आहे की भारताच्या कुठल्याही भौगोलिक ठिकाणी हे उपयोगी गुणी झाड सहजच उगवते.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. ● पाव किलो शेवग्याच्या शेंगा
 2. ● पाव वाटी तुरीची डाळ
 3. ● कांदा लसूण मसाला
 4. ● लालतिखट 1
 5. ● हिंग पाव चमचा
 6. ● हळद पाव चमचा
 7. ● दाण्याचा कूट पाव वाटी
 8. ● मीठ आवश्यकतेनुसार
 9. ● तेल

सूचना

 1. 1. प्रथम शेंगा चिरून घ्या
 2. 2. एका पातेल्यात थोडे पाणी, शेंगा आणि तूरडाळ घालून झाकण ठेवून गॅसवर 10 मिनिटे शजवून घ्यावे.
 3. 3. नंतर गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घालावे.
 4. 4. तेल तापल्यावर त्यात हिंग, हळद, शिजवलेल्या शेंगा (पाणी जास्त उरले असेल तर काढून ठेवावे), कांदा लसूण मसाला, लालतिखट, दाण्याचा कूट आणि मीठ घालावे.
 5. 5. चांगले हलवून घ्यावे. कोरडे वाटत असल्यास शेंगा शिजवलेले काढून ठेवलेले थोडे पाणी घालावे आणि 2 मिनिटांसाठी झाकण ठेवावे.
 6. 6. दोन मिनिटांनी झाकण उघडून पहावे तेल सुटू लागलेले दिसताच गॅस बंद करावा.
 7. 7. आपली शेवग्याच्या शेंगांची लबथबी भाजी तैय्यार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर