मुख्यपृष्ठ / पाककृती / चेत्तीनाड सोरक्कई कुरमा

Photo of Chettinad Sorakkai Kurma by Renu Chandratre at BetterButter
244
2
0.0(0)
0

चेत्तीनाड सोरक्कई कुरमा

Sep-01-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चेत्तीनाड सोरक्कई कुरमा कृती बद्दल

ही एक पारंपरिक तामिळनाडू ची डिश आहे , दुधी ची आंबट तिखट ही सोपी भाजी, भाता सोबत किंवा इलाई वडम सोबत खूप छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • तामिळ नाडू
  • सिमरिंग
  • ब्लेंडींग
  • अकंपनीमेंट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. सोलून बारीक चिरलेला दुधी किंवा लौकी 2 कप
  2. खवलेले ओले खोबरे 1 वाटी
  3. बारीक चिरलेला कांदा 1
  4. बारीक चिरलेला टोमॅटो 2
  5. आले लसूण ठेचलेले 2 चमचे
  6. काजू 6-8
  7. खसखस 2 चमचे
  8. उभी चिरलेली हिरवी मिरची 3-4
  9. तेल 1 मोठा चमचा
  10. मोहरी 1/2 चमचा
  11. जीरे 1 चमचा
  12. हळद 1/2 चमचा
  13. लाल तिखट 1/2 - 1 चमचा
  14. धणे पूड 1 चमचा
  15. गरम मसाला 1/2 - 1 चमचा
  16. चिंचेचा कोळ 2 चमचे
  17. मीठ चवीप्रमाणे
  18. कोथिंबीर चिरलेली सजावटीसाठी
  19. भात बरोबर सर्व्ह करायला

सूचना

  1. सर्व साहित्य एकत्रित करावे
  2. ओले खोबरे खवून घ्यावे
  3. एका मिक्सर च्या भांड्यात खवलेले खोबरे, काजू आणि खसखस टाकून , बारीक पेस्ट करून घ्या
  4. कढईत तेल गरम करावे, मोहरी जीरे तडतडले , की बारीक चिरलेला कांदा घालून खरपूस परतून घ्यावे
  5. आता ह्यात बारीक चिरलेला टोमॅटो , आले लसूण पेस्ट घालून परतावे , सर्व मसाले घालून परतावे
  6. अता, बारीक चिरलेला दुधी भोपळा , हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घालून , मऊ होईपर्यंत झाकून शीजवावे
  7. दुधी भोपळा शिजला की ह्यात ओले खोबरे , काजू आणि खसखस च वाटण आणि चिंचेचा कोळ घालावे।
  8. व्यवस्थित मिक्स करावे आणि झाकून तेल सुटे पर्यन्त शिजवावे
  9. कोथिंबीर घालावी
  10. गरमागरम भाता सोबत वाढावे आणि आनंद घ्यावे चेत्तीनाड सोरक्कई चा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर