Photo of Khobra firani roll by Smita Koshti at BetterButter
562
3
0.0(1)
0

Khobra firani roll

Sep-02-2018
Smita Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1/2 वाटी तांदुळ
  2. 1 नारळ ( खोबरे कीस, दूध, व पाणी)
  3. 2 चमचे खवा( दुध पावडर)
  4. 4 चमचे पनीर चुरा
  5. 2 कप दुध
  6. 1 कप पीठीसाखर (किंवा चवीनुसार)
  7. 1/2 छोटा चमचा वेलचीपूड ( किंवा कोणताही इसेंस)
  8. 2 चमचे सुकामेवा कतरण (आवडीनुसार)
  9. 1 चिमूटभर मीठ
  10. चिमूटभर खाण्याचा रंग ( आवडीनुसार)

सूचना

  1. तांदुळ धुवून रात्रभर भिजत घालून सकाळी नारळ पाण्यात बारीक वाटून घेणे
  2. स्टीमरमधे पातळ पापड्या वाफवून घ्या
  3. मी कढईत पाणी घालून त्यावर अडणी ठेवून ताटलीत पापड्या वाफवून घेतल्या आहेत
  4. ताटलीला तूपाचा हात लावून त्यावर पातळ मिश्रण पसरवून वाफवून घ्या आवडी प्रमाणे रवणात रंग घालून रंगीत पापड्या कराव्यात
  5. खवा, पनीर चुरा, खोबरे कीस, पीठी साखर, वेलचीपूड, थोडे सुकामेवा कतरण सगळं एकत्र करून थोडे परतून घ्या
  6. हे सारण तयार झाले
  7. तयार पापड्या वर सारण भरून रोल करून घ्या
  8. नारळाचे दूध, खोबर कीस, दूध, 3 चमचे तांदळाचे रवण, व साखर एकत्र करून उकळून घ्या
  9. सारखे हलवत रहावे. नाहीतर गुठळ्या होतात
  10. वेलची पुड, सुकामेवा कतरण घालून चांगले एकजीव करावे व पुन्हा उकळी आणावी
  11. हि फिरनी तयार. ही जास्त घट्ट नसावी, व पातळ ही नको
  12. आता पापड्या रोल प्लेट मधे रचा व वरून फिरनी ओता...
  13. खोबरं कीस घालून सर्व्ह करा.
  14. गरम गरम सर्व्ह करू शकतो किंवा फ्रिज मध्ये सेट करूनही वाढू शकतो.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Arya Paradkar
Sep-02-2018
Arya Paradkar   Sep-02-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर