मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळ आणि मुगाच्या डाळीची कोशिंबीर

Photo of Coconut and moong dal salad by archana chaudhari at BetterButter
991
1
0.0(0)
0

नारळ आणि मुगाच्या डाळीची कोशिंबीर

Sep-02-2018
archana chaudhari
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळ आणि मुगाच्या डाळीची कोशिंबीर कृती बद्दल

खूप हेल्दी आणि छान लागणारी ही कोशिंबीर माझ्या एका कर्नाटकी मैत्रिणीने मला शिकवली.तुम्ही देखील नक्की करून पाहा.

रेसपी टैग

  • सोपी
  • कर्नाटक
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. मुगडाळ १/२ कप
  2. नारळ १ कप किसलेले
  3. काकडी १ मध्यम(बारीक चिरून घेतलेली)
  4. कोथिंबीर २ टेबलस्पून (चरलेली)
  5. हिंग १ टीस्पून
  6. फोडणीसाठी
  7. तेल २ टेबलस्पून
  8. मोहरी १ टीस्पून
  9. उडीद डाळ १/२ टीस्पून
  10. हिरव्या मिरच्या ३(तेलात भाजून जाडसर कुटून घेतलेल्या)
  11. लिंबू १/२
  12. मीठ चवीनुसार

सूचना

  1. मूग डाळ स्वछ धुवून ३०मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
  2. एका भांड्यात भिजवलेली मूग डाळ,किसलेलं नारळ,चरलेली काकडी,हिंग,कोथिंबीर एकत्र करा.
  3. फोडणीचे तेल गरम करण्यासाठी ठेवा.
  4. तेल तापले की मोहरी,उडदाची डाळ टाका.
  5. जाडसर कुटलेल्या हिरव्या मिरच्या टाका.
  6. तयार फोडणी वरील डाळ,काकडी,नारळाच्या मिश्रणात टका आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  7. शेवटी लिंबू पिळून टाका.
  8. मीठ घाला.
  9. नारळ आणि मूग डाळीची छान कोशिंबीर तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर