मुख्यपृष्ठ / पाककृती / गूळ पोळी

Photo of GULPOLI by Deepali Khillare at BetterButter
0
2
0(0)
0

गूळ पोळी

Sep-03-2018
Deepali Khillare
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गूळ पोळी कृती बद्दल

महाराष्ट्रीयन सणाच्या दिवशी केली जाणारी मराठमोळी पारंपरिक गोड रेसिपी

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • महाराष्ट्र
 • रोस्टिंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. पिवळा गूळ अर्धा किलो किसून (चिकीचा गूळ वापरू नये.)
 2. तीळ भाजून पूड अर्धी वाटी
 3. डाळीचे पीठ एक वाटी
 4. वेलची पूड पाव चमचा
 5. तेल अर्धी वाटी

सूचना

 1. 1.किसणीला तेलाचा हात लावून गुळ किसून घ्यावा. गूळ किसला की खडा राहात नाही व पोळी फुटत नाही. टीप- गुळाची पोळी करताना गुळ व पोळीचा म्हणजेच कणकेचा घट्टपणा सारखाच असला पाहिजे गूळ खूप घट्ट व कणिक सेैलसर असल्यास गूळ बाहेर येतो.
 2. 2.डाळीचे पीठ तेलावर मंद गॅसवर बदामी भाजावेे.
 3. 3.किसलेल्या गुळात गार डाळीचे पीठ,तिळपूड ,वेलची पूड घालावी एकत्र करुन गूळ एकजीव करावा. टीप-आवडत असल्यास सुके खोबरे व खसखस भाजून गुळाबरोबर घालू शकतो. पण त्यामुळे पोळी फुटण्याची शक्यता असते.
 4. 4. कणिक चाळून कडकडीत तेल, डाळीचे पीठ व मीठ घालून घट्ट भिजवून तेलाच्या हाताने कणिक मळावी.
 5. 5.कणकेचे एकसारखे मोठ्या लिंबाच्या एवढे गोळे करावे . त्याच्या निम्मे गुळाचे गोळे करावे .दोन कणकेचे गोळे किंचित चपटे करून तेवढयाच आकाराची गुळाची गोळी करून मध्ये ठेवून मग तांदूळ पिठीवर लाटावे.
 6. 6.पातळ पोळी लाटून गरम तव्यावर खमंग भाजावी. पोळी तव्यावर फुटल्यास ओल्या फडक्याने तवा पुसून दुसरी पोळी घालावी. टीप-पोळी पातळ लाटली तरच खुसखुशीत होते जाड लाटली तर चिवट होते गूळ बाहेर येतो .
 7. टीप -गूळ पाव किलो घेतल्यास साधारण बारा ते पंधरा मध्यम आकारातील पोळ्या होतात .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर