मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याच्या पानांची भाजी

Photo of Drumstick leaves veggie by Shraddha Juwatkar at BetterButter
1118
2
0.0(0)
0

शेवग्याच्या पानांची भाजी

Sep-03-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याच्या पानांची भाजी कृती बद्दल

पावसाळ्यातले संसर्ग टळावेत आणि तब्येत चांगली राहावी म्हणून शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याची प्रथा असावी. मृग नक्षत्राला शेवग्याच्या पानांची भाजी करून त्याचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शेवग्याचा कोवळा पाला (साधारण एक जुडी होईल एवढा)
  2. दोन मोठे कांदे बारीक चिरून
  3. लसणाच्या पाकळ्या चार-पाच ठेचून
  4. जिरं अर्धा चमचा ,  हिरव्या मिरच्या तीन-चार बारीक चिरून
  5. चवीपुरतं मीठ , तेल
  6. किसलेले ओले खोबरे

सूचना

  1. शेवग्याची कोवळी पाने निवडून स्वच्छ धुवून घ्यावीत. नंतर बारीक चिरावित.
  2. एका कढईत तेल घेउन त्यात जिरे , हिंग, घालून फोडणी करावी. नंतर लसूण पाकळ्या, मिरची घालून परताव्यात.
  3. कांदे बारीक चिरून फोडणीत घालावा व लालसर परतून घ्यावा
  4. आता त्या त चिरलेली भाजी घालून व्यवस्थित परतून वाफेवर शिजवावी
  5. एक वाफ येउन गेल्यावर चविनूसार मीठ घालावे व पुन्हा परतून झाकण ठेवावे.. भाजी पूर्ण शिजल्यावर ओले खोबरे घालावे व भाजी गँसवरून उतरवून घ्यावी.
  6. ज्वारीच्या भाकरीबरोबर गरम गरम खाऊन घ्यावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर