मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडीचे मोदक

Photo of Ukad modak by Manasvi Pawar at BetterButter
769
2
0.0(0)
0

उकडीचे मोदक

Sep-03-2018
Manasvi Pawar
30 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडीचे मोदक कृती बद्दल

गणपती बाप्पा चा आवडता मोदक हे वेगवेगळ्या प्रकारे केले जातात त्यातील ही एक मराठी पद्धत

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. दीड वाटी तांदळाचे पीठ
  2. एक खवलेला नारळ
  3. १/२ वाटी गूळ किसून
  4. एक चमचा वेलची पूड
  5. एक चमचा साजूक तूप
  6. तेल दोन चमचे

सूचना

  1. प्रथम सारण तयार करण्यासाठी गूळ खवलेला नारळ आणि वेलची पूड घालून एकत्र करून व्यवस्थित शिजवून घ्यावे
  2. पीठ तयार करण्यासाठी एका भांड्यात एक वाटी पाणी उकळत ठेवावे त्यात एक चमचा साजूक तूप आणि किंचित मीठ घालावे
  3. उकळी आली की हळूहळू पीठ घालावे
  4. चमच्याने ढवळत राहावे गुठळ्या होता कामा नये
  5. झाकण ठेवून एक वाफ काढावी
  6. गॅस बंद करून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यावे
  7. थोडं तेल लावावे
  8. पीठ मळून झाले की छोटे गोळे करून त्याची हलक्या हाताने पारी करून घ्या
  9. एक चमचा सारण भरून कळ्या पाडून मोदकाचा आकार द्यावा
  10. मोदक पात्रत एक तांब्या पाणी ठेवून वरच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये वीस मिनिटे वाफवून घ्यावेत
  11. थोडं थंड झाल्यावर मोदकावर ताव मारावा पण बाप्पाला नैवेद्य दाखवून

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर