मुख्यपृष्ठ / पाककृती / वेज फ्राईड राईस

Photo of Veg fried rice by seema Nadkarni at BetterButter
438
0
0.0(0)
0

वेज फ्राईड राईस

Sep-04-2018
seema Nadkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेज फ्राईड राईस कृती बद्दल

ही Chinese dish aahe

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • चायनीज
  • पॅन फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 कप तांदूळ ( Chinese बनवायला तांदूळ वेगळा बाजारात उपलब्ध आहेत)
  2. 3-4 कप पाणी
  3. 1/4 कप वेगवेगळ्या रंगाचे भोपळी मिरची
  4. 1/4 कप बारीक चिरलेला कोबी
  5. 1/4 बारीक चिरलेला कांदा
  6. 1/4 कप बारीक चिरलेला हिरवा कांदा (ओला कांदा)
  7. 2 चमचा आले लसुण पेस्ट
  8. 2 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची
  9. चवी पुरते मीठ
  10. 2 चमचा रेड चिली सॉस
  11. 2 चमचा ग्रीन चिली सॉस
  12. 1 चमचा विनेगार
  13. 1 चमचा सोया सॉस
  14. 1/2 चमचा काळी मिरी पावडर

सूचना

  1. सवॅ प्रथम तांदूळ भिजत घालून घ्या.
  2. थोड्या वेळाने डबल पाणी घालून एक दाणा कच्चा राहिल असे शिजवून घ्यावे.
  3. शिजलेल्या भातात थोडे तेल घालून ठेवावे म्हणजे चिकटून राहात नाही.
  4. आता एका मोठय़ा कढईत तेल गरम करून त्यात आले लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे. तसेच सगळ्या बारीक चिरलेल्या भाज्या घालून लगेच परतून घ्यावे.
  5. त्यात रेड चिली सॉस, ग्रिन चिली सॉस व बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून एकत्र करून घ्यावे.
  6. आता त्यात शिजवून घेतलेल भात घालून त्यावर सोया सॉस आणि मीठ घालून एकत्र करावे.
  7. हवे असल्यास अजीनोमोटो घालून घ्या. ( मी हे मीठ वापरत नाही म्हणून उल्लेख केला नाही)
  8. वरुन बारीक चिरलेली कांद्याची पात घालून सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर