मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबोळी,काळावाटाणा सांभार,शेगलाची भाजी.

Photo of Aamboli,kalawatana sambhar,sheglachi bhaji. by Sonali Belose-Kayandekar at BetterButter
0
2
0(0)
0

आंबोळी,काळावाटाणा सांभार,शेगलाची भाजी.

Sep-04-2018
Sonali Belose-Kayandekar
60 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबोळी,काळावाटाणा सांभार,शेगलाची भाजी. कृती बद्दल

पुर्ण माहिती दिली आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • बॉइलिंग
 • सौटेइंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. २वाटी तांदूळ
 2. १वाटी उडदाची डाळ
 3. २/३चमचे जाडा रवा
 4. चवीला मीठ
 5. १/४चमचा मेथी दाणे
 6. उकडुन घेतलेला काळावाटाणा १वाटी
 7. कांदा -खोबरे वाटण १वाटी
 8. १/२बा.चिरलेला कांदा
 9. १मध्यम चमचा मालवणी मसाला
 10. हळद
 11. छोटा चमचा गरम मसाला
 12. फोडणी साठी ठेचून लसूण ५/६पाकळी
 13. फोडणी साठी तेल
 14. चवीला मीठ
 15. कोथिंबीर थोडी
 16. छोटि जुडी शेवग्याची पाने
 17. ३कांदे
 18. ४/५हि.मिरच्या चिरुन
 19. १वाटी ओले खोबरे
 20. तेल (खोबरेल पण )चालेल
 21. चवीला मीठ

सूचना

 1. तांदूळ व डाळ वेगवेगळ्या भांड्यात भिजत घालावी ७/८तास.तांदूळा मध्ये मेथी घाला
 2. नंतर ते मिक्सरमधुन वाटून घ्या.त्यात रवा घाला .व आंबवण्यासाठी बाजूला ठेवा.४तास तरी
 3. पिठ आल्यावर त्यात मीठ घालून .भिड्याच्या तव्यावर तेल लावून आंबोळी घालावी .झाकण ठेवा . परतवा.......आंबोळी तयार आहे
 4. उकडलेला काळावाटाणा मिक्सरमधुन भरडुन घ्या
 5. पातेल्यात तेल घ्या .गरम झाले की लसुण घाला .लसुण रंग बदलला की.कांदा परता
 6. नंतर त्यात हळद ,मालवणी मसाला परता.कांदा खोबरे वाटण परतवा तेल सुटेपर्यंत .आता त्यात काळावाटाणा मिश्रण घालावे .आवश्यक तेव्हढे पाणी घालावे ....सांभार उकळून त्यात मीठ व गरम मसाला घालून एक उकळी घ्यावी .कोथिंबीर घालावी .सांभार तयार
 7. कढईत तेल घ्यावे .तापल्यावर त्यात मिरच्या घालाव्यात कांदा परतुन घ्या .भाजी घालावी .परतुन घ्यावी .चवीला मीठ घालावे .परतुन झाकण ठेवा .शिजल्यावर ओले खोबरे घालावे ...भाजी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर