मुख्यपृष्ठ / पाककृती / काकडीचे धोंडस

Photo of Cucumber Cake by Deepa Gad at BetterButter
1218
5
0.0(0)
0

काकडीचे धोंडस

Sep-04-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काकडीचे धोंडस कृती बद्दल

श्रावण महिना आला की बाजारात मोठमोठ्या काकड्या कोकणात त्याला तवसे म्हणतात हे मोठे आणि जुन झालेले तवसे वापरून धोंडस बनवतात. काकडीचे धोंडस हे जास्त करून कोकणात तसेच गोव्यातही केले जातात, गोव्यात त्याला cucumber cake म्हणतात . हळदीचे पान त्या धोंडसवर ठेवून वाफवले तर अजूनच छान चव येते तर ते कसे बनवतात ते पाहू या

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी लापशी रवा
  2. १ वाटी गुळ
  3. १ वाटी काकडीचा किस
  4. १ वाटी ओले खोबरे
  5. शेंगदाणे भिजवलेले १ च
  6. तूप ४ च
  7. काजू तुकडे १/२ वाटी
  8. दूध १/२ वाटी
  9. वेलचीपूड
  10. चिमूटभर मीठ

सूचना

  1. काकडी साल व बिया काढून किसून घ्या (बिया नाही काढल्या तरी चालतील)
  2. सर्व साहित्य तयार ठेवा
  3. कढईत लापशी रवा २ च तुपात भाजून घ्या
  4. लालसर झाला की त्यात काकडीचा किस त्याच्या पाण्यासहित टाका
  5. थोडा वेळाने खोबरे, गुळ, मीठ, शेंगदाणे, काजू, तूप, दूध घालून एकजीव करा
  6. झाकण ठेवून २-३ वाफा काढा
  7. एका पसरट टोपाला तूप लावून घ्या
  8. त्यात मिश्रण घाला वरून काजू लावा
  9. गॅसवर तवा ठेवून त्यावर हा टोप ठेवून झाकण ठेवा व मंद गॅसवर ३५ ते ४० मिनिटे वाफवा
  10. थोडं थंड झाला की ताटात पलटवा, मस्त खरपूस भाजलेले दिसेल
  11. वड्या पाडून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर