मुख्यपृष्ठ / पाककृती / वरणफल/चकोल्या

Photo of Soupy wheat chops in dal by Suraksha Pargaonkar at BetterButter
564
2
0.0(0)
0

वरणफल/चकोल्या

Sep-04-2018
Suraksha Pargaonkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरणफल/चकोल्या कृती बद्दल

हा पदार्थ रोजच्या पोली भाजी जेवणात बदल म्हणून मी बनवते..पोटभरणीचा आहे,लगेच होतो,नि पौष्टिकसुद्धा...मी लहान असताना आई बनवायची माझ्यासाठी...

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. वरणासाठी
  2. १छोटी वाटी तूरडाल
  3. १छोटी वाटी मूगडाल
  4. २-३हिरव्या मिरच्या
  5. फोडणीसाठी
  6. 1/२चमचा जिरे
  7. 1/२चमचा मोहरी
  8. 1/२चमचा हिंग
  9. ५-६लसूण पाकल्या
  10. कडिपत्ता,हलद
  11. १मोठा चमचा मीठ
  12. वरुन टाकण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर
  13. कणकेसाठी
  14. १मोठा बाउल गव्हाचे पीठ
  15. चवीपुरते मीठ

सूचना

  1. एकीकडे तूरडाल ,मूगडाल नि त्यात हिरव्या मिरचीचे काप घालून कुकरमध्ये छान शिजवून घ्या.
  2. हे असे.
  3. तोपर्यंत गहू पीठात थोडं मीठ घालून कणिक मलून घ्या.20 मिनिटे कणिक भिजू द्या.
  4. पातेल्यात फोडणीसाठी तेल घेऊन मोहरी,जिरे,हिंग,कडिपत्ता,लसूण,शेवटी हलद अशी फोडणी करुन घ्या.त्यात शिजलेली डाल घालून नि थोडं गरम पाणी घालून पातल वरण तयार करून घ्या.चवीनुसार मीठ घाला.वरुन कोथिंबीर घाला नि हलवून घ्या.
  5. हे असे
  6. वरण तयार
  7. दुसरीकडे कणकीचा गोला घेऊन चपातीप्रमाणे लाटून.त्याचे सुरीने छोटे काप करा.
  8. हे काप गैसवरील उकलत्या वरणात सोडा.
  9. काप चांगले शिजले की झाले वरणफल :blush::blush::thumbsup::thumbsup:
  10. वरून तूपाची धार नि तोंडी लावायला लोणचं पापड झालं की एकदम झकास बेत...:yum::yum::yum:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर