मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीच्या ,बाजरीच्या, गव्हाच्या कोंड्याच्या व तांदळाच्या पापड्या

Photo of Jwarichya, Bajarichya,Gawhachya kondyachya papadya by Arya Paradkar at BetterButter
899
3
0.0(0)
0

ज्वारीच्या ,बाजरीच्या, गव्हाच्या कोंड्याच्या व तांदळाच्या पापड्या

Sep-04-2018
Arya Paradkar
4320 मिनिटे
तयारीची वेळ
240 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीच्या ,बाजरीच्या, गव्हाच्या कोंड्याच्या व तांदळाच्या पापड्या कृती बद्दल

भरपूर प्रमाणात फायबर मिळते मुलांना आवश्यक व आवडेल

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 8

  1. *** ज्वारीच्या चिकाच्या व कोंड्याच्या पापड्याचे साहित्य
  2. 1 किलो ज्वारी
  3. पाऊण वाटी लसुण पाकळ्या
  4. 1/2 वाटी तिखट
  5. 4-5 चमचे जिरे
  6. मीठ चवीनुसार
  7. **** बाजरीच्या कोंड्याच्या पापड्याचे साहित्य
  8. 1 किलो बाजरी
  9. पाऊण वाटी लसुण पाकळ्या
  10. 1/2 वाटी तिखट
  11. 4-5 चमचे जिरे
  12. मीठ चवीनुसार
  13. *** गव्हाच्या चिकाच्या कुर्डया व कोंड्याच्या पापड्याचे साहित्य
  14. 1 किलो गहू
  15. पाऊण वाटी लसुण पाकळ्या
  16. 1/2 वाटी तिखट
  17. 4-5 चमचे जिरे
  18. मीठ चवीनुसार
  19. *** तांदळाच्या पापड्या
  20. 1 किलो तांदूळ
  21. 2 जुडी पालक
  22. 1/2 लसुण पाकळ्या
  23. 12-15 हिरव्या मिरच्या
  24. 4-5 चमचे जिरे
  25. मीठ चवीनुसार

सूचना

  1. 1) ज्वारी 3-4 दिवस धुऊन भिजत ठेवावी, मात्र रोज पाणी बदलावे
  2. नंतर ज्वारी पाण्यातून काढून धुऊन निथळून घ्यावे
  3. ज्वारीत पाणी घालून एकजीव होईपर्यंत बारीक मिक्सर वर वाटून घ्यावे
  4. आता ते गाळून कोंडा वेगळा करावा व ज्वारीचा चिक मोठ्या भांड्यात घेवून 2-3 लि. पाणी मीठ जीरे घालून चांगले एकजीव होईपर्यंत शिजवून घेऊन त्याच्या पळीने प्लास्टिक वर पापड्या घालून 2-3 दिवस उन्हात दोन्ही बाजूंनी वाळवून घेणे
  5. 2) ज्वारीचा निघालेला कोंडा वाळवून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या
  6. नंतर त्यात 2-3 लि. पाणी, तिखट मीठ, वाटलेला लसुण घालून चांगले शिजवून घ्यावे
  7. त्याच्या ही पापड्या घालून 2-3 दिवस दोन्ही बाजूंनी वाळवून घेणे
  8. 3)बाजरी 5-6 तास भिजत ठेवून नंतर त्यातील पाणी काढून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे
  9. नंतर 2-3 लिटर पाणी तिखट मीठ जीरे घालून चांगले शिजवून घ्यावे व त्याचा पापड्या घालून 2-3 दिवस उन्हात दोन्ही बाजूंनी वाळवून घेणे
  10. 4) ज्वारी प्रमाणेच गव्हाची प्रोसिजर आहे ,गव्हाचा चीक मीठ घालून शिजवून सोर्यातून कुर्डया घालून 2-3 दिवस दोन्ही बाजूंनी वाळवून घेणे
  11. गव्हाचा कोंडा वाळवून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या
  12. नंतर त्यात 2-3 लि. पाणी तिखट मीठ जीरे कुटलेला लसूण घालून चांगले शिजवून त्याच्या पापड्या घालून चांगले 2-3 दिवस दोन्ही बाजूंनी वाळवून घेणे
  13. 5) 4-5 तास तांदूळ धुवून भिजत ठेवून नंतर त्यातील पाणी काढून घेतले
  14. पालक धुवून चिरून व लसुण मिरची जीरे घालून पेस्ट करून घ्यावी
  15. तांदळाचीही पाणी घालून पेस्ट करून घ्यावी
  16. नंतर दोन्ही एकत्र करून 2-3 लि. पाणी व मीठ घालून चांगले शिजवून त्याच्या पापड्या घालून चांगले 2-3 दिवस दोन्ही बाजूंनी वाळवून घेणे
  17. वाळलेल्या पापड्या तळून भाजक्या शेंगदाण्या बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर