मुख्यपृष्ठ / पाककृती / पोह्यांचा चिवडा

Photo of Pohyacha chiwada by Arya Paradkar at BetterButter
439
2
0.0(0)
0

पोह्यांचा चिवडा

Sep-05-2018
Arya Paradkar
60 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोह्यांचा चिवडा कृती बद्दल

हा एक पारंपारिक पदार्थ आहे खास दिवाळी व इतर प्रसंगी आ़वर्जन केला जातो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. 1 किलो पातळ पोहे
  2. 1 वाटी पंढरपूरी भाजके डाळे
  3. 2 वाट्या कच्चे शेंगदाणे
  4. 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप
  5. पाऊण वाटी तीळ
  6. 1 वाटी हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  7. 1 वाटी कढीपत्ता
  8. 1 /2 वाटी पिठी साखर
  9. 4-5 चमचे आमचूर पावडर
  10. 3-4 चमचे हळद
  11. 2 चमचे हिंग
  12. मीठ चवीनुसार
  13. 3-4 चमचे मोहरी
  14. तेल आवश्यकतेनुसार

सूचना

  1. पातळ पोहे ओव्हन मधे भाजून किंवा उन्हात तापवून घ्यावे, कढईत भाजल्यास आकसून जातात
  2. नंतर मोठ्या कढईत आवश्यक तेवढे तेल गरम करून त्यात क्रमाणे शेंगदाणे ,डाळे, खोबरे तळून बाजूला काढून ठेवणे
  3. नंतर त्या तेलात मोहरी,मिरच्या,कढिपत्ता तळल्यावर त्यात तीळ घालून चांगले परतून घ्यावे व त्यात तळलेले शेंगदाणे, खोबरे, डाळे घालून चांगले परतून घ्यावे
  4. नंतर मोठ्या भांड्यात पोहे व वरील फोडणी घालून चांगले मिक्स करावे व त्यात पिठीसाखर मीठ, आमचूर पावडर घालून चांगले मिक्स करावे
  5. आशा प्रकारे चिवडा तयार झाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर