Photo of Anarase by Arya Paradkar at BetterButter
1503
2
0.0(0)
0

अनारसे

Sep-05-2018
Arya Paradkar
5760 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अनारसे कृती बद्दल

हा एक पारंपारिक पदार्थ आहे,महाराष्ट्रात दिवाळीतील लक्ष्मी पूजनासाठी व अधिक महिना वाणासाठी हमखास केला जातो

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1/2 किलो बासमती तांदूळ
  2. 1/2 किलो देशी गुळ
  3. 100 ग्रॅम खसखस
  4. 2-4 चमचे दूध
  5. तळण्यासाठी तूप

सूचना

  1. तांदूळ धुवून 3-4 दिवस भिजत ठेवावे, पण त्यातील पाणी बदलत जावे
  2. 3 दिवसा नंतर धुवून निथळून स्वच्छ कपड्यावर पंख्याखाली 2 तास वाळवणे
  3. गुळ चिरून घ्यावा
  4. नंतर सुकवलेले तांदूळ व गुळ एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे
  5. त्या पिठाचा गोळा करून 2-3 दिवस झाकून पिठ मुरण्यासाठी ठेवावे
  6. आनरसे करते वेळी दुधा तुपाच्या हाताने मळून घ्यावे
  7. त्याचे पेढ्या ऐवढे लहान गोळे करून प्लास्टिक पिशवीवर खसखस पसरवून त्यावर थापून गरम तुपावर थापलेल्या खसखशीची बाजू वर करून तळून घ्यावे
  8. खुसखुशीत जाळीदार अनारसा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर