मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधीच्या सालांची चटणी

Photo of Bottle - Gourd Peel Chutney by Sanika SN at BetterButter
668
2
0.0(0)
0

दुधीच्या सालांची चटणी

Sep-05-2018
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधीच्या सालांची चटणी कृती बद्दल

खमंग व स्वादिष्ट चटणी

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एका मध्यम आकाराच्या दुधीची सालांचे तुकडे करुन घ्यावेत.
  2. २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  3. कढीपत्ता
  4. कोथिंबीर चिरून
  5. १ टीस्पून मोहरी
  6. १ टीस्पून पांढरे तीळ
  7. १/२ टीस्पून साखर
  8. १/४ टीस्पून हिंग
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम तेलात दुधीची सालं मंद आचेवर कुरकुरीत तळून घ्या / शॅलो फ्राय करा व एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
  2. त्याच पॅनमध्ये थोडे तेल गरम करून मोहरी, तीळ, हिंग, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून फोडणी तयार करा.
  3. त्यात चिरलेली कोथिंबीर घालून छान मिक्स करुन घ्या.
  4. आता ही खमंग फोडणी तळलेल्या दुधीच्या सालांवर ओतून, मीठ व साखर घालून छान मिक्स करून घ्या.
  5. आवडत असल्यास यात थोडे सुके खोबरे ही परतून घालू शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर