Photo of Masalebhat,, by Sonali Belose-Kayandekar at BetterButter
426
0
0.0(0)
0

मसालेभात.

Sep-06-2018
Sonali Belose-Kayandekar
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसालेभात. कृती बद्दल

मसालेभाताला लग्नात मानाचे स्थान होते.परंतु आता फार दुर्मिळ दिसतो.परंतु मैत्रीणिंनो करायला सोपे ,खुप खमंग व चविष्ठ आहे .

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २वाटी तांदूळ (बासमती)
  2. १/४ तोंडली उभी चिरून
  3. २वांगी
  4. १/२ वाटी मटारचे दाणे
  5. १/२वाटी तेल फोडणी साठी
  6. २ हि.मिरच्यांचे उभे काप
  7. कढिपत्ता फोडणी साठी.
  8. १ चमचा साखर
  9. १,१/२ चमचा गोडा मसाला .
  10. १ चहाचा चमचा मिरचीपुड
  11. १/४ चमचा हळद
  12. मोहरी व जिरे छोटा चमचा
  13. हिंग
  14. मीठ चवीप्रमाणे
  15. १ मोठा चमचा साजूक तुप
  16. काजुचे काप
  17. १ .वाटी बा.चिरलेली कोथिंबीर
  18. १वाटी ओलेखोबरे किसून

सूचना

  1. तांदूळ धूवुन निथळत ठेवा
  2. पातेल्यात तेल घ्यावे .तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी जिरे घालून फोडणी करावी
  3. कढिपत्ता व हिंग घालावे .
  4. त्यात आता चिरलेल्या भाज्या परतुन घ्याव्यात
  5. मिरच्यांचे तुकडे परतवावेत
  6. नंतर तांदूळ घालून पुन्हा परतुन घ्यावे
  7. काजुपाकळी घालावी
  8. त्यात आता मिरचीपुड ,हळद ,साखर व गोडा मसाला घालून व्यवस्थित परतुन घ्यावे
  9. चवीप्रमाणे मीठ घालावे
  10. तांदूळाच्या दुप्पट पाणी गरम करुन त्यात घालावे
  11. पहिला मोठ्या आचेवर शिजवा .पाणी आटल्यावर आच मंद करा.
  12. व भात शिजू घ्यावा .
  13. भात शिजल्यावर कडेने थोडे तुप सोडावे
  14. वाढताना त्यावर तुप ,ओलेखोबरे व कोथिंबीर घालून गरमागरम खायला घ्यावा .पापडासोबत
  15. तयार आहे मसालेभात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर