मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा बेसन लाडू

Photo of SUJI BESAN LADU by Aditi Bhave at BetterButter
451
2
0.0(0)
0

रवा बेसन लाडू

Sep-06-2018
Aditi Bhave
15 मिनिटे
तयारीची वेळ
180 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा बेसन लाडू कृती बद्दल

रव्याचे लाडू सारखे खाऊन कंटाळा येतो म्हणून रवा आणि बेसन चे लाडू , खमंग पण आणि tasty

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. रवा - 4 वाट्या
  2. साखर - साडे तीन वाट्या
  3. बेसन - 1 वाटी
  4. तूप - दिड वाटी
  5. पाणी- दिड वाटी
  6. वेलची पूड- 2 चमचे
  7. बदामाचे काप- पाव वाटी
  8. बेदाणे - वर लावण्यासाठी

सूचना

  1. प्रथम एका पॅन मध्ये 4चमचे तूप गरम करून घ्यावे.
  2. त्यात बेसन घेऊन ते भाजून घ्यावे.
  3. दुसऱ्या कढईत राहिलेले तूप घालून त्यात रवा भाजून घ्यावा.
  4. रवा एका ताटात काढून घ्यावा.
  5. त्या कढईत पाणी दिड वाटी व साखर साडे तीन वाटी घेऊन ढवळत राहावे.
  6. एकतारी पाक करून घ्यावा.
  7. त्यात मग भाजलेला रवा व बेसन, बदामाचे काप व वेलची पावडर घालून ढवळावे.
  8. हे मिश्रण 2 ते 3 तास असेच झाकून ठेवावे.
  9. मध्ये मध्ये ढवळून पहावे.
  10. लाडू वळताना बेदाणा लावून वळावेत.
  11. बेताचे ह्या साहित्यात 40 लाडू होतात
  12. बेसनाचा खमंग पणा व रव्याचा स्वाद असे हे लाडू तयार.
  13. आमच्या कडे नुसते रव्याचे किंवा नुसते बेसनाचे लाडू खाऊन कंटाळा आला तर मी असे लाडू करते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर