Photo of Puran poli by Manisha Khatavkar at BetterButter
517
2
0.0(0)
0

पुरणपोळी

Sep-06-2018
Manisha Khatavkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरणपोळी कृती बद्दल

पुरणपोळी ही कोणत्याही लोकप्रिय उत्सवा दरम्यान तयार केलेली एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • होळी
  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप चणाडाळ
  2. १ कप किसलेला गूळ
  3. एक कप मैदा
  4. १/२ कप गव्हाचे पिठ
  5. ७ ते ८ टेस्पून तेल
  6. १ टिस्पून वेलचीपूड
  7. कोरडे तांदुळाचे पीठ

सूचना

  1. चणाडाळ कूकरमध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून शिजवून घ्यावे. डाळ शिजली कि त्यातील पाणी निथळू द्यावे. हे पाणी वापरून कटाची आमटी करता येते
  2. डाळीतील पाणी निघून गेल्यावर हि डाळ पातेल्यात घ्यावे. त्यात किसलेला गूळ घालावा. मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. आटवताना ढवळत राहावे. जर ढवळायचे थांबवले मिश्रण पातेल्याला लागून करपू शकते. या पुरणात १ चमचा वेलचीपूड घालावी.
  3. मिश्रण घट्टसर झाले कि पातेले गॅसवरून उतरवावे. मिश्रण पुरणयंत्रातून फिरवून घ्यावे. 
  4. मैदा आणि कणिक मिक्स करून त्यात ५-६ चमचे तेल घालावे. आणि सैलसर मळून घ्यावे. भिजवलेले पिठ २ तास मुरू द्यावे.
  5. पुरणाचे दिड इंचाचे गोळे बनवून घ्यावे. मैद्याचा अर्धा ते एक इंचाचा गोळा घ्यावा व त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा.
  6. पोळपाटावर थोडी तांदुळाची पिठी घेउन हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. तव्यावर खरपूस भाजून घ्यावी. साजूक तूप घालून गरम गरम सर्व्ह करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर