Photo of Puranpoli, by Sonali Belose-Kayandekar at BetterButter
912
2
0.0(0)
0

पुरणपोळी.

Sep-06-2018
Sonali Belose-Kayandekar
75 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरणपोळी. कृती बद्दल

मैत्रीणिंनो पुरणपोळी ही अख्या महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.जरी करायला खटपट असली तरी मेजवानीत अग्रस्थानी.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १/४ कि.चणाडाळ
  2. १/४ कि पिवळा गुळ
  3. १ चमचा सुंठ पावडर
  4. १,१/२वाटी मैदा
  5. १वाटी गव्हाचे पिठ
  6. चमचाभर तेल
  7. १/४ चमचा हळद
  8. चवीप्रमाणे मीठ
  9. १मध्यम वाटी तेल
  10. पाणी
  11. तांदूळाची पिठी लाटण्यासाठी

सूचना

  1. प्रथम चणाडाळ धुवून भिजत ठेवा.
  2. परातीमध्ये दोन्ही पिठं एकत्र करुन थोडे मीठ घालून मळून घ्या
  3. आणि ते मळलेले पिठ तेलात तिंबायला ठेवून घ्या
  4. चणाडाळ भिजल्यावर त्यात थोडी हळद व १ चमचा तेल घालून शिजायला ठेवा.
  5. आच मध्यम ठेवा
  6. डाळ अधूनमधून तपासून पहा
  7. डाळ बोटचेपी झाल्यावर वेळून घ्या
  8. वेळून झाल्यावर त्यात गुळ घालून मिश्रण एकजिव करुन घ्या .
  9. मंद आचेवर डाळ व गुळ शिजू घ्या
  10. हळु हळु मिश्रण आटायला सुरवात होईल
  11. अधूनमधून ढवळत रहा
  12. मिश्रण घट्ट झाले की त्यात सुंठ पावडर घालून एकजिव करा.थोडे थंड होऊ घ्या
  13. पुरणयंत्रामधून वाटून घ्या ..झाले पुरण तयार आहे
  14. आता मळलेले पिठ परातीमध्ये काढून घ्या नंतर त्यात.थोडे पाणी व थोडे तेल .असे घेउन पिठ सैल करुन घ्या .
  15. तवा तापत ठेवा.आता मळलेला पिठाच्या गोळ्यांची पारी करून त्याच्या दुप्पट पुरण घालून गोळा तयार करुन पोळपाटावर तांदूळाची पिठी लावून पोळी अलगद हलक्या हाताने लाटाव्यात .
  16. मध्यम आचेवर पोळी दोन्ही बाजुनी भाजावी.
  17. झाली पुरणपोळी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर