मुख्यपृष्ठ / पाककृती / वडापाव

Photo of Vadapav by Teju Auti at BetterButter
0
2
0(0)
0

वडापाव

Sep-07-2018
Teju Auti
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वडापाव कृती बद्दल

Maharastrian authentic dish spicy and tangy

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • ब्लेंडींग
 • बॉइलिंग
 • फ्रायिंग
 • सौटेइंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. ४ उकडलेले बटाटे
 2. ३ लसूण पाकळ्या, १/२आलं ,५ हिरवी मिरची - यांची पेस्ट
 3. ३/४ कप बेसन
 4. ३/४ कप पाणी
 5. १/४ टीस्पून हळद
 6. १/४ टीस्पून मोहरी ,जिर
 7. १/४ टीस्पून हळद
 8. १ टेबलस्पून तेल
 9. कोथिंबीर , ४-५ कढीपत्ता पाने
 10. मीठ चवीप्रमाणे
 11. चिमुटभर सोडा

सूचना

 1. उकडलेले बटाटे सोलून हाताने कुस्करून घ्या. त्यात आलं-लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट,मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरून घाला.
 2. फोडणीच्या कढईत तेल गरम करा. तेल कडकडीत तापले कि त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, जिर ,कढीपत्ता पाने, हळद आणि हिंग घालून कुस्करलेल्या बटाट्याला फोडणी द्या. हाताने, फोडणी पूर्ण सारणात मिक्स करा . व वड्याचा आकार दयावा.
 3. वड्याच्या कव्हर साठी- ३/४ कप बेसन घ्या. त्यात हळद,मीठ आणि बेताचे पाणी घालून एकजीव करा.
 4. बॅटर मध्ये १ चमचा कडकडीत तेलाचे मोहन घाला म्हणजे कव्हर कुरकुरीत होईल.
 5. वडे तळण्यासाठी कढईत पुरेसे तेल घ्या. तेल तापले कि बॅटरमध्ये सारणाचा गोळा बुडवून तेलात सोडा.. वडे छान गोल्डन ब्राऊन रंग येई पर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर