Photo of Misal pav by Teju Auti at BetterButter
902
2
0.0(0)
0

मिसळ पाव

Sep-08-2018
Teju Auti
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिसळ पाव कृती बद्दल

Spicy and maharastrian dish

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. २ वाटी मोड आलेली मटकी
  2. २ मोठे कांदे
  3. १ टोमॅटो
  4. कांदा लसुण मसाला
  5. लाल मिरची पूड
  6. मिसळ मसाला
  7. १/२ वाटी तेल
  8. आल लसूण ची पेस्ट
  9. मीठ चवीनुसार
  10. १ छोटा चमचा मोहरी
  11. १ छोटा चमचा जिरे
  12. चिमुठभर हींग
  13. कढीपत्त्याची पाने
  14. १ वाटी बारिक चिरून घेतलेला कांदा
  15. बारिक चिरलेली कोथिंबीर
  16. फरसाण

सूचना

  1. मूग व मटकी मोड काढून घ्यावे.
  2. एका भांडयात तेल गरम करून घ्यावे. त्यात फोडणीचे साहित्य घालावे, मोहरी, जिरे, हींग व कढीपत्त्याची पाने घालावी,फोडणी झाली की लगेचच बारिक चिरलेला कांदा घालावा व लाल होईपर्यंत परतावा.
  3. कांदा लाल झाला की आल लसूण पेस्ट व बारिक चिरलेला टोमॅटो घालावा. टोमॅटो शिजला की त्यात कांदा लसुण मसाला, लाल मिरची पूड व मिसळ मसाला मीठ घालावे.
  4. ३ मिनिटे परतून झाले की त्यात मोड काढलेली मटकी घालावि.पाणी घालून झाकण ठेवून चांगले शिजू दयावे साधारण १५ मिनिट शिजवून गँस बंद करावा.
  5. एका प्लेटमध्ये तयार उसळ घ्यावी त्यात फरसाण, बारिक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालून पावासोबत सर्व्ह करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर