मुख्यपृष्ठ / पाककृती / काकडीचे सांदन

Photo of Kakadiche sandan by Chhaya Chatterjee at BetterButter
818
2
0.0(0)
0

काकडीचे सांदन

Sep-08-2018
Chhaya Chatterjee
120 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काकडीचे सांदन कृती बद्दल

काकडीच सांदन कोकणातील पदार्थ आहे .कोकणात याला तवसा बोलले जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. काकडीचा कीस 1 वाटी
  2. गूळ 1/2 वाटी
  3. इडलीचा रवा 1/2 वाटी
  4. किसलेला ओला नारळ 1/2 वाटी
  5. वेलची पावडर 1/2 चमचा
  6. सजावटीसाठी बदाम
  7. चिमूटभर मीठ

सूचना

  1. प्रथम गूळ थोड पाणी घालून पातळ करून घ्या.
  2. नंतर गूळात काकडीचा कीस, व नारळाचा कीस घालून एकत्र करून 10मि. बाजूला ठेवा.
  3. इडलीचा रवा 1 चमचा तूपावर हलका भाजून घेणे.
  4. भाजलेला रवा थंड झाल्यावर गूळ व काकडीच्या मिश्रणात घालणे.
  5. 1/2 चमचा हळद व चिमूटभर मीठ घालणे व 1 तास झाकून ठेवणे.
  6. एक तासाने त्यामध्ये वेलची पावडर घालून एकत्र करावे
  7. एका ॲलयमिनियचया डब्याला तेलाचा हात लावून बटर पेपर लावावा.
  8. बटर पेपरवर तूप लावून तयार मिश्रण त्यामध्ये घालणे.
  9. स्टीमर मध्ये 30 मि.वाफवून घेणे.
  10. 30मि. नंतर बाहेर काढून 10 मि. थंड झाल्यावर वड्या कापून घेणे.
  11. वड्या कापण्या आधी बदामने सजावट करणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर