Photo of FODNICHA BHATH by Runa Ganguly at BetterButter
321
2
0.0(0)
0

फोडणी भात

Sep-08-2018
Runa Ganguly
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणी भात कृती बद्दल

बरेचवेळा भात उरला कि आपण त्याचा फोडणीभात बनवतो.हा एक सोपं रेसिपी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २-३ वाट्या मोकळा भात
  2. १/२ वाटी गाजराचे तुकडे
  3. १ वाटी मटार
  4. १ लहान भोपळी मिरची उभी चिरून
  5. १/४ वाटी फरसबी
  6. ३-४ लाल सुक्या मिरच्या
  7. ३-४ चमचे तेल
  8. १/२ लहान चमचा हिंग
  9. १ लहान चमचा जिरे
  10. ७-८ कढीपत्ते
  11. २ चमचे लिंबाचा रस
  12. गरज प्रमाणे मीठ
  13. मूठभर चिरलेले किथिंबीर

सूचना

  1. आदल्या दिवशीचा भात असेल तर तो मोकळा करून घ्यावा
  2. सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात
  3. कढईत / नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करावे
  4. हिंग जिरे कढीपत्ता घालून फोडणी करावी
  5. लाल मिरच्यांमधल्या बिया नको असतील तर मिरच्या तोडून त्यातील बिया काढाव्यात.
  6. मिरच्या फोडणीत घालाव्यात.
  7. फोडणीत आधी मटार आणि फरसबी थोडी परतून २ मिनीटे वाफ काढावी. 
  8. नंतर भोपळी मिरची आणि गाजराचे बारीक तुकडे घालून वाफ काढावी.
  9. भाज्या अर्धवटच शिजवाव्यात, खुप शिजू देवू नयेत
  10. भाज्या शिजताना थोडे मिठ घालावे.
  11. नंतर त्यात मोकळा भात घालावा.
  12. थोडा परतून वाफ काढावी. लिंबाचा रस घालावा भाज्या शिजताना थोडे मिठ घातलेलेच आहे त्यामुळे आवश्यक असल्यासच मिठ घालावे
  13. कोथिंबीर घालावी
  14. आपल्या फोडणीचा भात तैयार आहे
  15. या भाताच्या फोडणीत थोडे आले ठेचून घातले तरी छान चव येते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर