मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या नारळाच्या करंज्या

Photo of KARANJI by Runa Ganguly at BetterButter
3559
2
0.0(0)
0

ओल्या नारळाच्या करंज्या

Sep-08-2018
Runa Ganguly
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या नारळाच्या करंज्या कृती बद्दल

दिवाळी व अन्य उत्सवात महाराष्ट्राचे हे अति उत्कृष्ट मिष्टान्न

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 10

  1. सव्वा कप खोवलेला ओला नारळ
  2. पाउण कप किसलेला गूळ
  3. १/२ टिस्पून वेलची पूड
  4. पाउण कप मैदा
  5. पाव कप रवा
  6. १ टिस्पून साजूक तूप, पातळ केलेले
  7. १/२ ते पाउण कप दूध
  8. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. गूळ व नारळ एकत्र करून पातेल्यात, मध्यम आचेवर शिजवावे.
  2. वेलचीपूड घालावी आणि घट्टसर मिश्रण करावे. 
  3. मिश्रण ओलसर असू नयेत नाहीतर करंज्या नरम पडतात
  4. करंजीच्या आवरणासाठी एका भांड्यात रवा आणि मैदा एकत्र करावा
  5. तूप कडकडीत गरम करून मोहन घालावे. 
  6. थोडे थंड झाले कि मोहन घातलेले तूप सर्व मैद्याला लागेल असे मिक्स करावे
  7. अंदाजे घेत घेत गार दूध घालावे आणि घट्ट मळून घ्यावे
  8. थोडा वेळ झाकून ठेवून द्यावे.
  9. १५-२० मिनीटांनी थोडे दूधाचा हबका मारून पिठ जरा कुटून घ्यावे
  10. पिठाचे एकेक इंचाचे गोळे करून घ्यावेत
  11. करंज्या वाळू नयेत म्हणून एक ताटली आणि एक ओला, पिळून घेतलेला कपडा तयार ठेवावा.
  12. करंज्या करण्यासाठी पिठाची एक गोळी निट मळून घ्यावी
  13. गोल आणि पातळसर पुरी लाटून घ्यावी
  14. मध्यभागी एक चमचाभर नारळाचे सारण ठेवावे.
  15. पुरीच्या अर्ध्या कडेला किंचीत दूध लावावे म्हणजे दोन्ही कडा निट चिकटतील आणि तळताना करंजी फुटणार नाही. 
  16. उरलेली रिकामी अर्धी बाजू दूध लावलेल्या बाजूवर आणून चिकटवावी
  17. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी.
  18. कातणाने अधिकचे पिठ कापून घ्यावे. 
  19. करंजी करून झाली कि ती ताटलीत ठेवून वरून ओला कपडा टाकून झाकावी म्हणजे करंजी सुकणार नाही. 
  20. अशाप्रकारे सर्व करंज्या करून घ्याव्यात.
  21. तळणीसाठी तेल गरम करावे.
  22. मध्यम आचेवर करंज्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.
  23. गरामस गरम करंज्या वाढायला तैयार आहे!

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर