Photo of Misal pav by Lata Lala at BetterButter
1012
3
0.0(0)
0

Misal pav

Sep-09-2018
Lata Lala
1440 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • स्टीमिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी मटकी, मुंग, सफेद वाटाणे,वाळ,काळे चणे मिक्स
  2. १ बटाटा
  3. तळण्यासाठी तेल
  4. १ कांदा
  5. १ टोमॅटो
  6. गरम मसाला 1 टीस्पून
  7. फरसाण
  8. कोथिंबीर
  9. लिंबू 1
  10. पाव 2
  11. कत बनवण्यासाठी :
  12. १ इंच आले
  13. २-३ मिरी
  14. १ लहान काडी दालचिनी
  15. २-३ लवंगा
  16. १ तमालपत्र
  17. १ चमचा जिरेपूड
  18. १ चमचा धनेपूड
  19. अर्धी वाटी खवलेला ओला नारळ
  20. १ मध्यम कांदा
  21. २ मध्यम टोमॅटो
  22. ४-५ लहान चमचे लाल तिखट
  23. फोडणीसाठी तेल
  24. आमसुल किंवा चिंच
  25. मीठ

सूचना

  1. मटकी, मुंग, सफेद वाटाणे, वाळ आणि काळे चणे १०-१२ तास कोमट पाण्यात भिजत घालावे. त्यात जर कडक मटकी आणि खडे असतील तर ते काढून टाकावे.
  2. सूती कपड्यात 12 तास बांधून मोड काढावेत.
  3. मोड आले कि कत बनवून घ्यावा.
  4. त्याचवेळी मटकी, मुंग,वाळ, काळे चणे आणि सफेद वाटाणे कूकरमध्ये २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी.
  5. कत बनवण्यासाठी लसूण पाकळ्या, आले, मिर्या, दालचिनी, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड,धनेपूड मिक्सरवर जेवढे बारीक होईल तेवढे बारीक करून घ्यावे.
  6. कढईत ४-५ चमचे तेल गरम करावे. त्यात मिक्सरमधून काढलेला मसाला घालून खमंग परतावा.
  7. मसाल्याचा छान गंध सुटला कि त्यात १ कांद्याच्या आणि २ टोमॅटोच्या मोठ्या फोडी घालून परतत रहावे.
  8. सर्वात शेवटी खवलेला नारळ घालून परतावा.
  9. मिश्रणाला तेल सुटले आणि कांदा शिजला कि गॅस बंद करून बाजूला काढून थंड करावे.
  10. मिश्रण थंड झाले कि त्यात एक भांडे पाणी घालून मिक्सरवर पातळ पेस्ट करून घ्यावी.
  11. नंतर मटकीची उसळ बनवून घ्यावी.
  12. पातेल्यात २-३ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून शिजवलेली मटकी घालावी. थोडे पाणी घालावे, १-२ चमचा गरम मसाला घालावा.
  13. बारीक गॅसवर उसळ उकळत असताना दुसर्या गॅसवर लहान कढईत अगदी थोडे बटाट्याचे तुकडे तळण्यापुरते तेल गरम करावे (साधारण अर्धी वाटी). (बटाटे तळल्यावर ७-८ चमचे तेल उरले कि त्यातच कट बनवता येतो.)
  14. १ बटाटा सोलून त्याचे लहान चौकोनी तुकडे करावे, आणि मध्यम आचेवर बटाटे व्यवस्थित तळून घ्यावे, कच्चे राहू देऊ नये.
  15. तळलेले बटाट्याचे तुकडे उसळीत टाकावेत. चवीपुरते मिठ घालावे
  16. लहान कढई खालचा गॅस बारीक करून उरलेल्या तेलात हळद, हिंग, ४-५ चमचे लाल तिखट घालून तयार केलेली मसाल्याची पातळ पेस्ट घालावी.
  17. मीठ घालावे.
  18. आंबटपणासाठी २-३ आमसुल किंवा थोडा चिंचेचा कोळ घालावा.
  19. आवश्यकतेनुसार पाणी घालून १ उकळी काढावी.
  20. उसळ आणि कट तयार झाला कि कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा
  21. नंतर डिशमध्ये १ डाव उसळ घालावी.
  22. त्यावर १ पळी कत घालावा.
  23. त्यावर फरसाण, कांदा, टोमॅटो घालावे.
  24. लिंबू पिळून तयार मिसळ पाव बरोबर खावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर