Photo of Sol kadhi by Lata Lala at BetterButter
675
2
0.0(0)
0

सोल कढी

Sep-09-2018
Lata Lala
45 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोल कढी कृती बद्दल

मालवणी सोलकढी ही एक विशेष चवदार आणि पाचक पाककृती आहे. याचे मुख्य घटक आहेत कोकम (आमसुले) आणि नारळाचा रस. सहसा सोलकढी जेवणानंतर नुसतीच प्यावी किंवा शेवटच्या भातावर घ्यावी अशी पध्दत आहे. कोकणातील जवळपास सर्वच घरात सोलकढी दुपारच्या जेवणात करण्यात येते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 10 ते 15 आमसुलं
  2. १ कप नारळाचे दूध
  3. १ इंच आले
  4. 2 लसुन पाकळ्या
  5. २ वाट्या पाणी
  6. २ हीरव्या मिरच्या
  7. २ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
  8. १/२ टिस्पून जिरे
  9. चवी पुरते मिठ

सूचना

  1. प्रथम कोकम कोमट पाण्यात भिजत घालावीत
  2. अर्ध्या-पाऊण तासाने त्याच पाण्यात आमसुलं कुस्करून घ्यावीत आणि पाणी गाळून घ्यावे.
  3. लसूण बारीक चिरून घ्यावी.
  4. जिरे किंचीत कुटून घ्यावे.
  5. नंतर आमसुलाचे पाणी, नारळाचे दूध, लसुन, ओली मिरची, कोथिंबीर, आले हे सर्व मिक्सरमधुन बारीक करुन घ्यावे
  6. त्यानंतर या वाटपामध्ये थोडे पाणी मिसळुन हे मिश्रण गाळुन घ्यावे
  7. थंडच सर्व्ह करावे
  8. सर्व्ह करताना वरून जिरेपूड भुरभूरावी.
  9. जिरेपूड आधीच मिक्स करू नये नाहीतर सोलकढीचा रंग बदलतो.
  10. सोलकढी नुसतीच किंवा भाताबरोबर खायलाही छान लागते.
  11. किंवा सोलकढी जेवणानंतर नुसतीच प्यावी -

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर