मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाचे लाडू

Photo of Moong Dal Ladoo by Sanika SN at BetterButter
3514
0
0.0(0)
0

मुगाचे लाडू

Sep-09-2018
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाचे लाडू कृती बद्दल

पिवळ्या मुगाच्या डाळीचे पौष्टिक लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी पिवळी मूगडाळ
  2. ३/४ वाटी पिठीसाखर
  3. ४-५ टेस्पून साजूक तूप
  4. १/२ टीस्पून जायफळपूड
  5. १/२ टीस्पून वेलचीपूड

सूचना

  1. साहित्य
  2. जाड बुडाच्या  पॅनमधे मुगाची डाळ मध्यम आचेवर कोरडी, गुलाबी रंगावर भाजावी.
  3. ताटात पसरून गार होऊ द्यावी.
  4. गार झाल्यावर मिक्सरमधे बारीक /  रवाळ  दळून घ्यावी.
  5. चाळणीने चाळून घ्यावे  जर का डाळ, चाळ उरले असल्यास पुन्हा दळून घ्यावे व चाळून घ्यावे.
  6. गरम पॅनमधे पीठ घालून परतायला सुरुवात करावी व  लागेल तसे तूप घालत रहावे.
  7. खमंग वास यायला लागला व पीठ चांगले भाजले गेले की ताटात काढून पसरवावे.
  8. गार झाल्यावर त्यात चवीप्रमाणे पिठीसाखर , वेलचीपूड व जायफळपूड घालून मिसळून घ्यावे.
  9. पीठ हाताला कोरडे वाटल्यास चमचाभर पातळ तूप वरून घालावे व लाडू बांधावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर