मुख्यपृष्ठ / पाककृती / काळ्या वाटाण्याची आमटी /उसळ

Photo of Black Peas Curry by Sanika SN at BetterButter
1469
1
0.0(0)
0

काळ्या वाटाण्याची आमटी /उसळ

Sep-09-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काळ्या वाटाण्याची आमटी /उसळ कृती बद्दल

कोकणातील खास काळ्या वाटाण्याची आमटी /उसळ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. १ मोठा कांदा उभा चिरलेला 
  2. ३-४ टेस्पून सुके खोबरे 
  3. १ टेस्पून अख्खे धणे 
  4. १ टीस्पून बडीशेप
  5. १ टीस्पून जीरे
  6. १ मसाला वेलची  
  7. ३ हिरवे वेलदोडे
  8. ३ लवंगा
  9. १ इंच दालचिनी
  10.  २-३ लसूण पाकळ्या 
  11. १ इंच आले
  12. दीड वाट्या काळे वाटाणे रात्रभर भिजवून , कुकरला बोटचेपे शिजवून घेणे
  13. १ कांदा बारीक चिरलेला
  14. १ टोमॅटो बारीक चिरलेला
  15. ७-८ कढीपत्ता
  16. २ तमालपत्र
  17. १ टीस्पून मोहरी
  18. १/२ टीस्पून हळद
  19. २-३ टीस्पून लाल तिखट 
  20. मीठ चवीनुसार 
  21. बारीक चिरलेली कोथींबीर 
  22. तेल

सूचना

  1. साहित्य
  2. एका पॅनमध्ये तेल २ टेस्पून तेल गरम करून त्यात अख्खे धणे, जीरे, मसाला वेलची, हिरवे वेलदोडे, दालचिनी, लवंगा, बडीशेप चांगले ३-४ मिनिटे परतून  घ्यावे. 
  3. त्यात बारीक चिरलेला लसूण व आले घालून त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतणे.
  4. आता त्यात उभा चिरलेला कांदा घालून तो ब्राऊन होईपर्यंत मध्यम आचेवर परतणे.
  5. त्यात सुके खोबरे घालणे व मध्यम आचेवर ब्राऊन होईपर्यंत सतत परतणे . (खोबरे करपवायचे नाही) 
  6. मिश्रण पूर्ण गार झाले की मिक्सरच्या भांड्यात काढून , थोडे पाणी घालून मुलायम वाटण तयार करुन घ्यावे.
  7. दुसर्‍या भांड्यात तेल गरम करुन मोहरी , तमालपत्र व कढीपत्ता घालून फोडणी करावी.
  8. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो मऊसर होईपर्यंत परतणे. त्यात आता बारीक चिरलेला टोमॅटो, लाल तिखट, हळद व मीठ घालून चांगले परतणे.
  9. शिजवलेले काळे वाटाणे घालून एकत्र करावे. त्यात भाजलेल्या कांद्या-खोबर्‍याचे वाटप घालून सगळे नीट एकत्र करणे.
  10. आवश्यक्तेनुसार पाणी घालून उकळी काढावी.
  11. उकळी आली की मध्यम आचेवर झाकण लावून ९-१० मिनिटे शिजवावे.
  12. आमटी  / उसळ तयार झाली की बारीक चिरलेली कोथींबीर वरून पेरावी. 
  13. फोटो
  14. ही उसळ तुम्ही साध्या भाताबरोबर, चपाती, भाकरी, नीर डोसे किंवा घावन बरोबर सर्व्ह करु शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर