मुख्यपृष्ठ / पाककृती / भरली भेंडी

Photo of Bharali Bhendi by Shruti Brown at BetterButter
1562
7
0.0(0)
0

भरली भेंडी

Sep-09-2018
Shruti Brown
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरली भेंडी कृती बद्दल

भेंडीची भाजी चिकट आणि बुळबुळीत अशीच तिची ओळख सर्वांना असत. भेंडीभजी , भेंडी कढी , भेंडी मसाला भेंडी सांबर , दही- भेंडी , भेंडी रायता , कुरकुरी भेंडी , भरली भेंडी असे विविध प्रकार या भेंडीपासून बनवले जातात .पण या सर्वांत अगदी सोपा आणि झटपट होणारा प्रकार म्हणजे भरली भेंडी . अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात हि भरली भेंडी . लहानपणी अचानक मला कधीतरी मासे खायची इच्छा झाली कि माझी आजी मला हि भरली भेंडी खमंग तळून द्यायची आणि मी मात्र ती तळलेल्या माशांप्रमाणे मजा घेत खायची .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 6

  1. १/ ४ किलो उभी चीर दिलेली भेंडी
  2. 2 चमचे कोथिंबीर
  3. १/४ वाटी ओलं /सुकं खोबरं
  4. 1 हिरवी मिरची
  5. २ मोहें चमचे शेंगदाणा कूट
  6. १ चमचा लाल तिखट
  7. १ चमचा हळद
  8. १ चमचा धनेजिरे पूड
  9. १ चमचा पांढरे तीळ
  10. १ चमचा गरम मसाला
  11. चवीपुरते मीठ
  12. आवश्यकतेनुसार तेल

सूचना

  1. प्रथम धुतलेल्या भेंडीला मध्ये चीर द्यावी पण तुकडे होऊ देउ नये
  2. आता खोबरं , लसूण , कोथिंबीर , मिरची एकत्र बारीक वाटून घ्यावं
  3. वाटलेलं मिश्रण एका भांड्यात काढून घेऊन त्यात तेल सोडून उरलेले इतर सर्व जिन्नस घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे
  4. तयार केलेले मिश्रण हळुवार पणे भेंडी मध्ये भरून घ्यावे
  5. गॅस वर मंद आचेवर थोडंसं तेल घालून ते गरम होताच त्यावर भरलेली भेंडी अलगद उचलून ठेवावी
  6. मंद आचेवर ५ मिनिटं झाली कि फक्त एकदाच भेंडी पलटून घ्यावी
  7. १० मिनीटात भेंडी खमंग कुरकुरीत शिजतात
  8. हि भरली भेंडी गरमा गरम पोळी , वरण भात , भाकरी सोबत खाऊ शकतो .
  9. मराठी स्टार्टर म्हणून सुद्धा हि भरली भेंडीचा काहीच तोड नाही

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर