एग करी | Egg Curry Recipe in Marathi

प्रेषक Kankana Saxena  |  24th Aug 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Egg Curry by Kankana Saxena at BetterButter
एग करी by Kankana Saxena
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  90

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1306

0

एग करी recipe

एग करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Egg Curry Recipe in Marathi )

 • चवीनुसार मीठ
 • तेल
 • सजविण्यासाठी ताजी कोथिंबीर
 • ताजे आल्ले - 1/2 इंच
 • मिरची पावडर - 1/2 टी स्पून
 • साखर - 1/2 टी स्पून
 • कोरडी आमचूर पावडर - 1 टी स्पून किंवा लिंबाचा रस - 1/2 टी स्पून
 • धणे पावडर - 1 टी स्पून
 • जीरे पावडर - 1 टी स्पून
 • हळद पावडर - 1 टी स्पून
 • हिरवी मिरची - 1
 • लसूण पाकळ्या - 2 ते 3
 • लाल मिरच्या - 3 ते 4
 • 1 कांदा ( मोठा , पातळ स्लाईस केलेला )
 • बटाटा - 1 ( स्लाईस केलेला )
 • टोमॅटो - 2 ( बारीक चिरलेले )
 • उकडलेली अंडी - 3

एग करी | How to make Egg Curry Recipe in Marathi

 1. मीठाच्या पाण्यात अंडी उकडून घ्यावीत, ती थंड पाण्यात बुडवून त्याची कवचे काढून घ्यावीत . लसूण, आल्ले, हिरवी मिरची आणि लाल मिरचीची पेस्ट बनवावी .
 2. धारदार सुरीने उकडलेल्या अंड्याचे छोटे तुकडे करावेत. त्याला मीठ, हळद पावडर आणि मिरची पावडर चोळून घ्यावी.
 3. एका खोल पॅनमध्ये अंडी थोडीशी भाजून घ्यावीत. त्याला सौम्य सोनेरी रंग आला पाहिजे . त्यानंतर बाजूला ठेवावे.
 4. आंच बंद करू नये, काही तेल आणि स्लाईस केलेला बटाटा त्यात घालावा . मीठ घालून मिसळून घ्यावे.
 5. बटाटा मऊ होईपर्यंत तळावे आणि बाजूला ठेवावे. त्याच पॅनमध्ये लसूण, आल्ले व मिरची पेस्ट घालावी. मिश्रण थोडेसे तांबूस झाल्यावर त्यात चिरलेला कांदा, मीठ घालावे, चिरलेला कांदा पारदर्शक होईपर्यंत शिजवावा.
 6. आता मसाले घालावेत - जीरे पावडर, धणे पावडर घालून ढवळावे आणि चिरलेले टोमॅटो टाकावेत.
 7. 1 मिनिट शिजवल्यावर त्यात साखर मिसळावी . टोमॅटो मऊ झाल्यावर कोरडी आमचूर पावडर किंवा अर्ध्या लिंबाचा रस घालावा आणि अर्धा कप पाणी टाकावे.
 8. आणखी 1 मिनिट शिजवावे , तळलेला बटाटा व उकडलेली अंडी घालावीत. कमीत कमी 5 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावे .
 9. ताज्या कोथिंबीरीने सजवून गरमागरम खायला द्यावे.

My Tip:

काहीही नाही.

Reviews for Egg Curry Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo