मुख्यपृष्ठ / पाककृती / तिखट आप्पे

Photo of Spicy Appe by Sanika SN at BetterButter
1029
2
0.0(0)
0

तिखट आप्पे

Sep-09-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिखट आप्पे कृती बद्दल

पौष्टिक व चवदार पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ३ वाट्या तांदूळ
  2. १ वाटी उडदाची डाळ
  3. ३/४ वाटी मूग डाळ
  4. १/२ वाटी तूरीची डाळ
  5. १/२ वाटी चणा डाळ
  6. १/४ वाटी जाड पोहे
  7. ४-५ हिरव्या मिरच्या
  8. १ छोटा कांदा
  9. कढीपत्ता
  10. कोथींबीर
  11. मीठ चवीनुसार

सूचना

  1. साहित्य
  2. प्रथम सर्व डाळी व तांदुळ स्वच्छ धुवून, एकत्र ५-६ तास भिजवणे.
  3. मिश्रण वाटण्याआधी पोहे भिजवून घेणे, मिरच्या बारीक चिरून घेणे.
  4. मिक्सरच्या भांड्यात डाळ-तांदूळ, भिजवलेले पोहे व बारीक चिरलेल्या मिरच्या एकत्र करून वाटून घेणे.
  5. वाटलेल्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथींबीर व मीठ घालून चांगले एकत्र करावे.
  6. आप्पेपात्र गॅसवर ठेवून त्यात थोडेसेच तेल घालावे व तयार मिश्रण डावाने घालून आप्पे सोनेरी रंगावर फ्राय करावे.
  7. उलटवून दुसरी बाजू ही छान होऊन द्यावी, गरज वाटल्यास थोडे तेल घालावे.
  8. तयार आप्पे नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर