मुख्यपृष्ठ / पाककृती / कोल्हापुरी मिसळ पाव

Photo of Kolhapuri misal by safiya abdurrahman khan at BetterButter
1500
2
0.0(0)
0

कोल्हापुरी मिसळ पाव

Sep-10-2018
safiya abdurrahman khan
600 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोल्हापुरी मिसळ पाव कृती बद्दल

ही मिसळ बर्‍यापैकी झणझणीत होते. झेपत नाही त्यानी तिखट कमी करण्यासाठी दही, शेव, टोमॅटो घालावा.तिखट नको असणार्‍यानी मटकी जास्त घ्यावी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी मटकी
  2. 1 बटाटा
  3. तळण्यासाठी तेल
  4. 1 कांदा
  5. 1 टोमेटो
  6. गरम मसाला
  7. फरसाण
  8. कोथिंबीर
  9. लिंबू
  10. पाव
  11. कट बनवण्यासाठी साहित्य
  12. 4 लसूण पाकळ्या
  13. 1 इंच आले
  14. 2-3 मिरी
  15. 1 लहान काडी दालचिनी
  16. 2-3 लवंगा
  17. 1 तमालपत्र
  18. 1 चमचा जीरेपुड
  19. 1 चमचा धनेपूड
  20. 1/2 वाटी खवलेला ओला नारळ
  21. 1 मध्यम कांदा
  22. 2 मध्यम टोमेटो
  23. 4-5 लहान चमचे लाल तिखट
  24. फोडणीसाठी तेल
  25. आमसुल किंवा चिंच
  26. मीठ चविपुरते

सूचना

  1. मटकी 8-10 तास कोमट पाण्यात भिजत घालावे. त्यात जर कडक मटकी आणि खडे असतील तर ते काढून टाकावे. सुती कपड्यात बांधून मोड काढावेत.
  2. मटकीला मोड आले कि कट बनवून घ्यावा. त्याचवेळी मटकी कूकरमध्ये २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी.
  3. कट बनवण्यासाठी लसूण पाकळ्या, आले, मिर्या, दालचिनी, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड,धनेपूड मिक्सरवर जेवढे बारीक होईल तेवढे बारीक करून घ्यावे.
  4. कढईत 5 चमचे तेल गरम करावे. त्यात मिक्सरमधून काढलेला मसाला घालून खमंग परतावा. मसाल्याचा छान गंध सुटला कि त्यात 1 कांद्याच्या आणि 2 टोमॅटोच्या मोठ्या फोडी घालून परतत रहावे.
  5. सर्वात शेवटी खवलेला नारळ घालून परतावा. मिश्रणाला तेल सुटले आणि कांदा शिजला कि गॅस बंद करून बाजूला काढून थंड करावे. मिश्रण थंड झाले कि त्यात १ भांडे पाणी घालून मिक्सरवर पातळ पेस्ट करून घ्यावी.
  6. नंतर मटकीची उसळ बनवून घ्यावी. पातेल्यात 2-3 चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून शिजवलेली मटकी घालावी.
  7. थोडे पाणी घालावे, 1-2 चमचा गरम मसाला घालावा. बारीक गॅसवर उसळ उकळत असताना दुसर्या गॅसवर लहान कढईत अगदी थोडे बटाट्याचे तुकडे तळण्यापुरते तेल गरम करावे.
  8. 1 बटाटा सोलून त्याचे लहान चौकोनी तुकडे करावे, आणि मध्यम आचेवर बटाटे व्यवस्थित तळून घ्यावे, कच्चे राहू देऊ नये. तळलेले बटाट्याचे तुकडे उसळीत टाकावेत. चवीपुरते मिठ घालावे.
  9. 1 बटाटा सोलून त्याचे लहान चौकोनी तुकडे करावे, आणि मध्यम आचेवर बटाटे व्यवस्थित तळून घ्यावे, कच्चे राहू देऊ नये. तळलेले बटाट्याचे तुकडे उसळीत टाकावेत. चवीपुरते मिठ घालावे.
  10. आंबटपणासाठी 2-3 आमसुल किंवा थोडा चिंचेचा कोळ घालावा. आवश्यकतेनुसार पाणी घालून 1 उकळी काढावी.
  11. उसळ आणि कट तयार झाला कि कांदा बारीक चिरून घ्यावा.
  12. नंतर डिशमध्ये 1 डाव उसळ घालावी. त्यावर 1 पळी कट घालावा. त्यावर फरसाण, कांदा,घालावे. लिंबू पिळून तयार मिसळ पाव बरोबर खावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर