मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळकुटातल्या शेंगा .

Photo of Tilkutatalya shenga.... by Sonali Belose-Kayandekar at BetterButter
0
1
0(0)
0

तिळकुटातल्या शेंगा .

Sep-10-2018
Sonali Belose-Kayandekar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळकुटातल्या शेंगा . कृती बद्दल

मैत्रीणिंनो तिळकुट म्हणजे (खुराष्णीची चटणी ) .....माझं माहेर रायगड असल्यामुळे हा प्रकार आजीपासून आमच्या घरात बनवला जातो .त्या बाजुला तिळकुटातल्या बर्याच भाज्या बनवितात .तोंडी लावायला छान व खमंग.......खरच करून पहा.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ३/४ शेवग्याच्या शेंगा
  2. १मध्यम कांदा
  3. ५/६ लसुण पाकळ्या
  4. १डाव तेल
  5. १/२ चमचा तिखट
  6. १/४ चमचा हळद
  7. २/३ चमचे तिळकुट (बाजारात उपलब्ध आहे)
  8. चवीप्रमाणे मीठ
  9. सजावटीसाठी कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम शेंगा कापून त्यात पाणी घालून उकळत ठेवा.थोडे मीठ घालावे .
  2. अधूनमधून शेंगा शिजल्या की नाहीत ते पहा.
  3. शेंगा शिजल्यावर वेळून घ्या .(बोटचेपी शिजवू नये)
  4. शेंगा निथळल्यावर तिखट ,हळद थोडे मीठ .तिळकुट लावून बाजुला ठेवा
  5. एका कढईत तेल घ्या .तेल तापल्यावर लसणीची फोडणी करा
  6. लसणीचा रंग बदलला की कांदा परतून घ्या .
  7. आता.शेंगा घालून .अलगद परतवा .नाहीतर शेंगा मोडतात .(पाखडून घेतले तरी चालेल.)
  8. एक दणदणित वाफ काढावी .आच बंद करा.
  9. थोडी कोथिंबीर भुरभुरा
  10. तयार आहेत तिळकुटातल्या शेंगा ..........

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर