मुख्यपृष्ठ / पाककृती / तुरीच्या दाण्यांची उसळ

Photo of turichya danyachi by Seema jambhule at BetterButter
0
0
0(0)
0

तुरीच्या दाण्यांची उसळ

Sep-10-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुरीच्या दाण्यांची उसळ कृती बद्दल

पावसाळा सुरू झाला की पालेभाज्या फारशा मिळतही नाहीत आणि त्या कराव्याशाही वाटत नाहीत. मग त्याच त्याच फळभाज्या खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी कडधान्यांचा मोठा आधार असतो. साधारणपणे उसळी सगळ्यांना आवडतात. हवं तर मसालेदार रस्सा करा किंवा साध्या फोडणीच्या करा, कडधान्यांना आपली स्वतःची अशी खास चव असते त्यामुळे ती चवदारच लागतात. मसूर, मूग, मटकी, चणे, चवळी या खास महाराष्ट्रीय उसळी. विदर्भात खास करून तुरीच्या दाण्याची उसळ बनवली जाते

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

 1. एक वाटी तुरीचे वाळवलेले दाणे
 2. , 2 कांदे
 3. लसूण अद्र्क पेस्ट 1/2 चमचा
 4. एक टोमॅटो
 5. एक टेबलस्पून सुकं खोबरं
 6. कोथींबीर
 7. एक टीस्पून तिखट
 8. दीड ते दोन टीस्पून काळा/ गोडा मसाला,
 9. दोन टीस्पून तेल
 10. हळद पाव टिस्पून
 11. मोहरी
 12. जिरे
 13. हिंग
 14. मीठ चवीनुसार

सूचना

 1. तुरीचे दाणे कुकरला 7-8 शिट्टी मध्ये शिजवुन घ्या
 2. कांदा खोबर भाजून घ्या व त्याची पेस्ट बनवा
 3. एका भात तेल गरम करून त्यात जिरे मोहरी टाका व नंतर कांदा टाकून परतुन घ्या
 4. आता त्यात अद्र्क व लसूण पेस्ट टाकून परता व त्यात वाटलेला मसाला टाका व 1 मिनट परतुन घ्या
 5. त्यात जिरे धने पावडर टाका व परता नंतर त्यात तिखट हळद मीठ व गोडा मसाला टाकून तेल सुटे पर्यंत परता
 6. नंतर त्यात शिजवलेले तुरीचे दाणे टाका
 7. 3-4 मिनट शिजुवून घ्या व रश्श्या साठी हवं ऐवड पाणी टाकून उखडून घ्या व वरून बारीक कोथिंबीर टाका
 8. तुरीच्या दाण्याची उसळ तयार
 9. n

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर