मुख्यपृष्ठ / पाककृती / कोंबडी रस्सा

Photo of Chicken in gravy by Lata Lala at BetterButter
748
2
0.0(0)
0

कोंबडी रस्सा

Sep-10-2018
Lata Lala
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोंबडी रस्सा कृती बद्दल

ही चिकन करी बघून तोंडाला पाणी सुटले की नाही? ही चमचमीत, झणझणीत चिकन करी बनवायला एकदम सोपी आणि झटपट तयार होणारी आहे

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. भाग १ : चिकन - ५०० ग्रॅम ( बोनलेस व लेग पीस)
  2. दही - ४ टेबल स्पून
  3. आले लसूण पेस्ट - २ टेबल स्पून
  4. लाल तिखट - ३ टी स्पून
  5. धनेपूड - २ टेबलस्पून
  6. जीरेपूड - १ टी स्पून
  7. हळद 1/2 टी स्पून
  8. एमडीएच कीचेन किंग मसाला - २ टीस्पून ९.
  9. चिकन मसाला 1 टी स्पून
  10. मीठ - चवीनुसार
  11. भाग २ :
  12. कांदा - २ मध्यम आकाराचे पातळ उभे काप करून
  13. टोमॅटो किसलेले 2
  14. हळद - २ टी स्पून
  15. लाल तिखट - 1 टी स्पून
  16. पाव वाटी किसलेले खोबरे
  17. कसूरी मेथी
  18. तेल - २-३ टेबलस्पून
  19. कोथिंबीर चिरुन 

सूचना

  1. चिकन स्वच्छ धुवून भाग १ मध्ये नमूद केलेले सर्व साहित्य एकत्र करावे.
  2. चिकन कमीतकमी अर्धा तास दही आणि इतर मसाल्यात मुरवून ठेवावे.
  3. एका कढईत तेल गरम करावे
  4. कांद्याचे काप गरम तेलात सोडून बराबर हलवावे. 
  5. कांदा तपकिरी रंगाचा झाल्यावर त्यात हळद व लाल तिखट टाकावी.
  6. किसलेले खोबरे टाकून परतून घेणे
  7. किसलेला टोमॅटो टाकून परतणे
  8. मुरवलेले चिकन देखील ह्याच वेळी कढईत ओतावे.
  9. थोडा वेळ (२ मिनिटे) परतावे.
  10. जसा रस्सा हवा असेल त्या प्रमाणात पाणी घालावे.
  11. घातलेल्या पाण्यानुसार मीठ अॅडजस्ट करावे.
  12. कसूरी मेथी हाताने कुस्करून टाकावी.
  13. साधारण २०-२५ मिनिटे कमी आचेवर झाकण घालून शिजवावे.
  14. किंवा कुकर ला 2 सीटी होई पर्यंत शिजवून घेणे
  15. चमचमीत चिकन करी ज्वारी किवां तांदुळाच्या भाकरी सोबत मस्तच लागते
  16. भाकरी नसेल तर गरमागरम फुलका, वाफाळता भात सोबत खायला मजा येते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर