प्रथम मुगाची डाळ खमंग लालसर भाजून घ्यावी
गार झाल्यावर मिक्सर मधून किंवा घरगंटी मधून थोडी जाडसर दळून घेणे
अर्धी वाटी तूप कढईत घालून त्यात मुगाचे पीठ घालून परतत राहावे
मध्ये मध्ये गरज लागेल तसे 1 ..1 चमचा तूप घालावे खमंग वास भाजल्याचा यायला लागला की तीळ घालावे
पुन्हा परतावे
तूप सुटायला लागले कडे कडे ने की गॅस बंद करावा
गूळ बारीक चिरून घ्यावा
मिश्रम कोमट झाल्यावर त्यात वेलची पूड,गूळ, तीळ मिक्स करावे
चांगले मळून एकजीव करावे
वाटल्यास पुन्हा तूप घालावे
आणि छान लाडू वळावे
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा