प्रथम डाळ तांदूळ धुवून थोडे पाणी घालून ठेऊन देणे
कुकर गॅस वर ठेऊन त्यात 2 डाव तेल घालून फोडणी करायला घेणे
प्रथम फोडणीत वरील सर्व खडे मसाले एक एक करत घालणे
नंतर डाळ तंदुळ घालून परतून घेणे
नंतर त्यात डाळ तांदुळाच्या दुपटीने पाणी घालून पुन्हा वरून एक ग्लास जास्तीचे पाणी घालणे
मिश्रणाला उकळी यायला लागली की त्यात पावडरी मसाले एक एक करत घालावे,
मीठ चवीनुसार घालावे
कुकर ला झाकण लावून 3 शिट्ट्या कराव्या
जेव्हा वाफ निघून जाईल आणि कुकरचे झाकण उघडेल तेव्हा मिश्रण पुन्हा एकदा डावाने हलवून एकत्र करावे
दुसऱ्या गॅस वर 1 डाव फोडणीस तेल घालावे
त्यात जिरे, हळद,हिंग,भरपूर लसूण लाल सुक्या मिरच्या घालून फोडणी करावी
सर्व्ह करताना डाळ खिचडी वर 2 चमचे ही फोडणी घालून सर्व्ह करावे
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा