मुख्यपृष्ठ / पाककृती / नागपुरी खिचडी

Photo of Nagpuri Khichadi by Renu Chandratre at BetterButter
792
4
0.0(0)
0

नागपुरी खिचडी

Sep-11-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नागपुरी खिचडी कृती बद्दल

विदर्भातील गावरण जेवण , ही खिचडी नेहमीच्या खिचडी पेक्षा जरा कोरडी आणि फडफडीत असते, आणि वांग्या च्या झणझणीत भाजी सोबत खाल्ली जाते। वाढताना वरून मोहरी आणि लसणाची ची खमंग फोडणी टाकून खातात , अजूनच मज्जा ।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ १/२ वाटी
  2. तुरीची डाळ १ वाटी
  3. तेल १ मोठा चमचा
  4. मोहरी १ चमचा
  5. जीरे १ चमचा
  6. ठेचलेले लसूण २-३ चमचे
  7. मीठ चवीनुसार
  8. हळद १/४ चमचा
  9. लाल तिखट १ चमचा

सूचना

  1. डाळ तांदूळ मिक्स करावे आणि स्वच्छ धुवून २ वाटी पाण्यात १० -१५ मिनिटे भिजवून ठेवावे
  2. कुकर मध्ये तेल गरम करा, मोहरी जीरे टाका
  3. वर ठेचलेला लसूण आणि हळद तिखट घाला
  4. लगेच भिजलेले डाळ तांदूळ आणि चवीला मीठ घाला
  5. व्यवस्थित मिक्स करा आणि कूकरच झाकण लावून २-३ शिट्ट्या येऊ द्या
  6. गॅस बंद करा आणि प्रेशर निघाले की उघडून , एकदा हलक्या हाताने मिक्स करा
  7. वर कोथिंबीर घाला
  8. तेल, मोहरी , हिंग, हळद आणि लाल तिखटाची फोडणी करावी
  9. खिचडी वर फोडणी टाकावी, आणि वांग्याच्या भाजी , ताका , पापड आणि सलाद सोबत गरमागरम सर्व्ह करावे
  10. मज्जा घ्या खमंग नागपुरी खिचडी चा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर