मुख्यपृष्ठ / पाककृती / मूगाची आमटी -

Photo of Whole green gram curry by Lata Lala at BetterButter
589
3
0.0(0)
3

मूगाची आमटी -

Sep-11-2018
Lata Lala
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूगाची आमटी - कृती बद्दल

एक चविष्ट आणि पौष्टिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी हिरवे अखे मूग
  2. २ चमचे खवलेला नारळ
  3. ४ पाकळ्या लसूण
  4. १ लहान कांदा
  5. १ टोमॅटो
  6. २ टिस्पून गोडा मसाला
  7. सुपारीएवढी चिंच
  8. १/४ टिस्पून मोहोरी,
  9. चिमुटभर हिंग
  10. १/४ टिस्पून हळद
  11. १ टिस्पून लाल तिखट,
  12. २ चमचे तेल
  13. मीठ
  14. कोथिंबीर

सूचना

  1. मूग १०-१२ तास भिजत घालावे. पाण्यातून उपसून जाड सुती कापडात ८-१० तास गच्च बांधून मोड येऊ द्यावेत.
  2. किंवा सादे मूग ही वापरू शकतो
  3. मूग २ शिट्ट्या करून कूकरमध्ये शिजवून घ्यावे.
  4. कढईत तेल गरम करावे.
  5. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट, ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालून फोडणी करावी.
  6. नारळ परतावा.
  7. कांदा बारीक करून घालावा.
  8. कांदा परतला कि त्यात टोमॅटोच्या फोडी घालाव्यात.
  9. टोमॅटो १-२ मिनीटे परतून त्यात मूग घालावे.
  10. मूग १-२ मिनीटे परतून त्यात २ भांडी पाणी, चिंच घालावी.
  11. एक उकळी काढून गोडा मसाला घालावा.
  12. मीठ घालावे. थोडा वेळ मध्यम आचेवर उकळू द्यावे.
  13. चिरलेली कोथिंबीर घालावी.
  14. गरम गरम तूप भाताबरोबर हि आमटी झकास लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर