मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवभाजी

Photo of Shevbhaji by Archana Chaudhari at BetterButter
0
1
0(0)
0

शेवभाजी

Sep-12-2018
Archana Chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवभाजी कृती बद्दल

आजी कडून आईला.... आई कडून मला....मिळालेली ही पाककृती ....घरात संगळ्यांची प्रिय.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 6

  1. शेवसाठी बेसन २ कप
  2. तेल१ टेबलस्पून
  3. हळद १/२ टीस्पून
  4. तिखट १ टीस्पून
  5. मीठ चवीनुसार
  6. मीठ तळण्यासाठी
  7. भाजीसाठी कांदे २ लांब चिरून घेतलेले
  8. सुके खोबरे १/२ कप किसलेले
  9. आले १/२ इंच
  10. लसूण ६पाकळ्या
  11. धणे १ टेबलस्पून
  12. तिखट १ टीस्पून
  13. धणे पावडर १ टीस्पून
  14. खान्देशी शेवभाजी मसाला १ टेबलस्पून
  15. तेल २ टेबलस्पून
  16. मीठ चवीनुसार

सूचना

  1. तव्यावर कांदा थोडेसे तेल टाकून भाजून घ्या.
  2. नंतर खोबरे पण तेल टाकून भाजून घ्या.
  3. नंतर धणे पण तेल टाकून भाजून घ्या.
  4. आता भाजलेला कांदा, भाजलेले खोबरे,भाजलेले धणे,आले,लसूण मिक्सरमध्ये पाणी टाकून बारीक वाटून घ्या.
  5. शेवंसाठी एका भांड्यात बेसन,तेल,हळद,तिखट,मीठ पाण्याने घट्टसर गोळा बनवून घ्या.
  6. कढईत तेल तापवून शेवांच्या साच्याने शेव बनवून घ्या.
  7. नंतर त्याच कढईत वरील वाटलेले वाटण परतवून घ्या.
  8. एका वाटीत तिखट,धणे पावडर,शेव मसाला घेऊन त्यात गरम पाणी टाकून पेस्ट बनवून घ्या.(यामुळे भाजीला रंग छान येतो.)
  9. मसाला परतत असतांना वाटीमधील पेस्ट टाकून परता.
  10. तेल सुटू लागले की गरम पाणी घाला.
  11. मीठ घाला.
  12. एक उकळी आली की आवडीप्रमाणे शेव टाका.(कमीच टाकतात)
  13. पोळी किंवा भाकरी सोबत खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर