Photo of undi by supriya padave (krupa rane) at BetterButter
624
1
0.0(0)
0

ऊंडी

Sep-12-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ऊंडी कृती बद्दल

कोकणात न्याहरी किंवा संध्याकाळी नाश्ता साठी बनविण्यात येणार एक पदार्थ कमी तेलात ऊंडी बनविता येते ,या सोबत खोबरा चटणी फार छान लागते मी या सोबत सांबर पण केले आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक वाटी इडली रवा
  2. पाव वाटी किसलेले ओले खोबरे
  3. एक चमचा चना डाळ
  4. एक चमचा उडिद डाळ
  5. पाव चमचा मेथी
  6. पाव चमचा राई
  7. पाव चमचा हींग
  8. दहा ते बारा कड़ी पत्ता पाने
  9. मीठ
  10. चटनी साठी
  11. पाव वाटी ओले खोबरे
  12. दोन हिरवी मिरची
  13. तीन लसुन पाकळी
  14. पाव चमचा जीरे
  15. थोडिशि चिंच
  16. मुठभर कोथिम्बीर
  17. मीठ

सूचना

  1. इडली रवा दोन वाटी पाणी टाकून 25 ते 30 मिनिटे भिजत ठेवा
  2. ओले खोबरे थोड़े पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घ्या
  3. सर्व साहित्य एकत्र जमा करा
  4. दोन चमचे तेल तापत ठेवा आता त्यात राई हींग उडिद डाळ चना डाळ मेथी व् कदीपत्त टाकून चांगले परतून घ्या आता हयात रवा व् खोबरे चे मिश्रण ओता
  5. सात ते आठ मिनिटांत हे मिश्रण घट्ट गोळा होण्यास सुरुवात होईल
  6. आता हे मिश्रण ठंड होउ दया त्यानंतर हयाचे छोटे गोळे बनवून घ्या व् मधे बोटाने प्रेस करुन घ्या
  7. आता हे सर्व चालाणि त ठेवून दहा मिनिट वाफवुंन घ्या
  8. चटनी चे सगळे साहित्य एकत्र करुन चटणी वाटून घ्या
  9. ऊंडी चटनी व् सांबर सोबत serve करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर