मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबोला भात आणि कढी

Photo of Ambola bhat with kadhi by Archana Chaudhari at BetterButter
856
0
0(0)
0

आंबोला भात आणि कढी

Sep-12-2018
Archana Chaudhari
720 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबोला भात आणि कढी कृती बद्दल

महाराष्ट्राच्या खान्देश प्रांतातील हा पदार्थ.लग्नांमध्ये या पदार्थांला विशेष महत्त्व असते. तस पाहिलं तर आपण आपल्या रोजच्या नेहमीच्या जेवणात ह्या हेल्दी पदार्थांला नक्कीच बनवू शकतो.

रेसपी टैग

 • मध्यम
 • महाराष्ट्र
 • प्रेशर कूक
 • बॉइलिंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. अंबोला भातासाठी
 2. ज्वारी २ कप
 3. कढीसाठी
 4. आंबट ताक ४ कप
 5. ज्वारीचे पीठ १ टेबलस्पून
 6. बेसनपीठ १ टेबलस्पून
 7. आले,लसूण, जिरे पेस्ट 1 टीस्पून
 8. दगडफुल १
 9. कढीपत्ता ६ पाने
 10. हिंग १/२ टीस्पून
 11. जिरे १/२ टीस्पून
 12. मोहरी १/२ टीस्पून
 13. तूप २ टेबलस्पून
 14. मीठ चवीनुसार

सूचना

 1. ज्वारी धुवून पाणी काढून ५ मिनिटे ताटात ठेवा.
 2. वरील ज्वारी मिक्सरमध्ये हाय स्पीड वर जाडसर दळून घ्या.
 3. सुपाने अथवा ताटाने ज्वारी पाखडून घ्या,जेणेकरून ज्वारीचे साले निघून जातील.
 4. आता ही पाखडलेली ज्वारी १२ तास पाण्यात भिजवून ठेवा.
 5. १२ तासानंतर ज्वारी कुकर मध्ये ६ ते ७ शिट्या देवून शिजवून घ्या.
 6. नंतर एका जाड बुडाच्या भांड्यात शिजवलेल्या ज्वारी मध्ये भरपूर पाणी टाकून परत १ तास मंद आचेवर ज्वारी पारदर्शक होईपर्यंत शिजून घ्या.
 7. ताका मध्ये ज्वारीचे पीठ,बेसन पीठ, आले, लसूण, जिरे पेस्ट टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या.
 8. कढईत तूप गरम करून त्यात जिरे,मोहरी,हिंग, कढीपता, दगडफुल टाका.
 9. ताक टाका.
 10. मीठ घाला.
 11. उकळी येईपर्यंत सतत ढवळत रहा.
 12. गरम गरम अबोला भात कढी सोबत आणि शेंगदाण्याच्या चटणी सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर