मुख्यपृष्ठ / पाककृती / शेपूची वडी

Photo of SHEPU vadi by Samiksha Mahadik at BetterButter
1085
2
0.0(0)
0

शेपूची वडी

Sep-12-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेपूची वडी कृती बद्दल

शेपूची भाजी सहसा कोणाला आवडत नाही म्हणून आशा प्रकारची वडी केली की सगळे आवडीने खातात माझा मुलाला फार आवडते अतिशय पौष्टिक आहे शेपू..

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 जुडी शेपू
  2. 1 वाटी बेसन
  3. पाव वाटी तांदळाचे पीठ
  4. 2 चमचे आलं लसूण पेस्ट
  5. 1 चमचे धणे जिरेपूड
  6. तिखट चवीनुसार
  7. हळद
  8. मीठ
  9. 1 चमचा चिंचेचा कोळ

सूचना

  1. प्रथम शेपू निवडून धुवून छान बारीक चिरून घ्यावी
  2. मग एका बाऊलमध्ये चिरलेला शेपू, बेसन, तांदळाचे पीठ, आलं लसुण पेस्ट, धनेजिरे पूड, तिखट, हळद, मीठ चिंचेचा कोळ घालून मिक्स करून घ्या
  3. मग त्यात थोडेसे गरजेपुरते पाणी घालून छान गोळा करून घ्या
  4. मग भांड्यात हे गोळे ठेवून मोदकपात्रात 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्या
  5. मग थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा
  6. गरम तेलात छान डीप फ्राय करा
  7. शेपू वडी तयार.. ही नुसती खायला सुद्धा छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर