मुख्यपृष्ठ / पाककृती / उडीद डाळ वडे आणि बासुंदी

Photo of Udad dal wada with basundi by archana chaudhari at BetterButter
689
1
0.0(0)
0

उडीद डाळ वडे आणि बासुंदी

Sep-12-2018
archana chaudhari
720 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उडीद डाळ वडे आणि बासुंदी कृती बद्दल

महाराष्ट्रातील खान्देशी हा मेनू अगदी लोकप्रिय आहे.चवीला एकदम छान!!

रेसपी टैग

  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 8

  1. वड्यासाठी साले नसलेली उडीद डाळ २ कप
  2. हिरव्या मिरच्या ७
  3. लसूण पाकळ्या ६
  4. बडीशेप २ टीस्पून
  5. धणे २ टीस्पून
  6. मीठ चवीनुसार
  7. कोथिंबीर १ कप बारीक चिरून
  8. तळण्यासाठी तेल
  9. बासुंदीसाठी
  10. दूध २ लिटर
  11. साखर १/२ कप
  12. वेलची पावडर १/२टीस्पून
  13. जायफळाची पावडर १/४ टीस्पून

सूचना

  1. उडीद डाळ स्वछ धुवून १२ तास पाण्यात भिजत घाला.
  2. डाळ भिजल्यावर ५ते६ वेळेस पाण्याने धुवून घ्या. असे केल्याने वडे छान हलके होतात.
  3. आता धुतलेल्या डाळीतून संपूर्ण पाणी निथळून घ्या.
  4. डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या.(खूप बारीक पेस्ट करू नका)
  5. मिरच्या, लसूण, बडीशेप, धणे,मीठ जाडसर वाटा.
  6. एका भांड्यात वाटलेली डाळ, वाटलेला मसाला,कोथिंबिर टाकून छान एकत्र करून घ्या.
  7. तेल तापले की वड्याच्या मिश्रणाचा लहान गोळा घेऊन तो एका प्लास्टिकच्या कागदावर ठेवून जाडसर थापा.
  8. खरपूस तळून घ्या.
  9. बासुंदीसाठी दूध अर्धे होईपर्यंत आटवून घ्या.
  10. त्यात साखर, वेलची पावडर, जायफळ पूड टाका आणि परत थोड्या वेळ गरम करा.
  11. गरम गरम वडे बासुंदीसोबत खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर