मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडीचे मोदक

Photo of Ukadiche Modak by Suchita Wadekar at BetterButter
1
1
0(0)
0

उकडीचे मोदक

Sep-14-2018
Suchita Wadekar
50 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडीचे मोदक कृती बद्दल

हि पाककृती माझ्या सासूबाईंनी शिकवली. त्या मूळच्या कोकणातल्या मुरुडच्या, त्यामुळे उकडीचे मोदक आणि वालाचे बिरडे हा मूळचा कोकणी मेनू गणपती स्थापनेच्या दिवशी आमच्या घरीही दरवर्षी केला जातो. उकडीचे मोदक आमच्याकडे सर्वांच्या म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा मेनू. या दिवशी केलेले मोदक आणि बिरडे दोन्हीही अगदी चविष्ट बनते. आज हे तुमच्यासाठी ...

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • स्टीमिंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. सुवासिक तांदूळ पिठी 3 वाटी
 2. 3 चमचे मैदा
 3. 3 चमचे तूप
 4. अर्धा चमचा मीठ
 5. 6 वाटी पाणी
 6. 3 नारळ खोऊन घेणे
 7. पाऊण वाटी खसखस
 8. 1 चमचा वेलची पावडर
 9. दीड पाव गुळ (2वाटी)

सूचना

 1. प्रथम एका पातेल्यात 6 वाटी पाणी घेऊन त्यात 3 चमचे तूप आणि अर्धा चमचा मीठ घालावे आणि उकळी आणावी.
 2. एका ताटात 3 वाटी तांदूळ पिठी आणि 3 चमचे मैदा घ्यावा.
 3. उकळी आलेल्या पाण्यातील एक वाटी पाणी काढून ठेवावे आणि उरलेल्या पाण्यात तांदूळ पीठ आणि मैदा घालावा.
 4. लाटण्याने सर्व मिश्रण घोटून घ्यावे, (आवश्यक वाटले तरच काढून ठेवलेले पाणी वापरावे) आणि त्यावर झाकण ठेवावे.
 5. यानंतर गॅसवर एका कढईत 3 नारळाचा चव घ्यावा.
 6. त्यामध्ये गुळ आणि साखर घालावी.
 7. खसखस मिक्सरला ओबडधोबड करून घ्यावी.
 8. आणि ती नारळ गुळाच्या मिश्रणात घालावी.
 9. वेलची पावडर घालावी.
 10. सर्व मिश्रण एकत्र करून एकजीव होईपर्यंत हलवावे. आपले सारण तयार झाले.
 11. वाफवलेली तांदळाची उकड एका परातीत किंवा मोठ्या ताटात घेऊन तूप लावून चांगली मळून घ्यावे आणि त्याचे गोळे तयार करावेत.
 12. चाळणीवर केळीची पाने घालून ठेवावीत.
 13. नंतर दूध पिशवी कट करून घ्यावी पुरी यंत्रावर एक गोळा घेऊन त्याची पारी बनवावी.
 14. पारी फोटोत दाखवल्याप्रमाणे खोलगट आकाराची करून घ्यावी आणि त्यात सारण भरावे.
 15. अशाप्रकारे आपला मोदक तयार झाला.
 16. तयार झालेले मोदक चाळणीत ठेऊन 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्यावेत.
 17. आपले मोदक तयार झाले.
 18. वालाचे बिरडे सोबत सर्व्ह करावेत "उकडीचे मोदक"

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर